मराठी बातम्या /बातम्या /Viral /

Google Map वर रस्ता शोधणाऱ्या मुलाला दिसलं भीतीदायक दृश्य; व्हायरल झाला फोटो

Google Map वर रस्ता शोधणाऱ्या मुलाला दिसलं भीतीदायक दृश्य; व्हायरल झाला फोटो

ब्रिटनमध्ये राहणारा 12 वर्षीय रॉरी चॅपमॅन आपल्या आई वडिलांसोबत एका टापू लिटल हिल्ब्रे आयलँडवर फिरण्यासाठी गेला होता. एक दिवशी त्यांना फिरण्यासाठी जायचं होतं, यासाठी त्यानं रस्ता शोधण्याचा प्रयत्न केला

  • Published by:  Kiran Pharate
नवी दिल्ली 06 सप्टेंबर : तुम्ही स्मार्टफोन (Smartphone) वापरत असाल तर गूगल मॅप (Google Map) तुम्हाला नक्कीच माहिती असेल. गूगल मॅप एक मोबाईल अॅप आहे जे लोकांना रस्ता शोधण्यासाठी म्हणजेच नेव्हिगेशनसाठी मदत करतं. हे एक असं ऑनलाईन अॅप आहे जे तुमच्या गल्लीतील छोट्या रस्त्यांपासून इतर देशातील मोठमोठ्या शहरांपर्यंतचे रस्ते शोधून देतं. लोक या अॅपचा वापर करून आपला प्रवास अनेकदा सोपा करताना दिसतात. एका मुलानंही याच अॅपच्या माध्यमातून रस्ता शोधण्याचा प्रयत्न केला मात्र त्याला मॅपवर असं काही दिसलं जे पाहून त्याला धक्का बसला. झालं असं की ब्रिटनमध्ये राहणारा 12 वर्षीय रॉरी चॅपमॅन आपल्या आई वडिलांसोबत एका टापू लिटल हिल्ब्रे आयलँडवर फिरण्यासाठी गेला होता. एक दिवशी त्यांना फिरण्यासाठी जायचं होतं, यासाठी त्यानं रस्ता शोधण्याचा प्रयत्न केला. जेव्हा त्यानं मॅपवर आयलँडचा नकाशा उघडला तेव्हा त्याला धक्का बसला. हे आयलँड एका अतिशय अजब जागेवर होतं आणि याचं नाव इंग्रजीमध्ये 'पृथ्वीच्या मध्यभागी असलेलं होल' (Hole to the Centre of the Earth) असं होतं. युवकानं पूर्ण फोनच गिळला; स्कॅनमध्ये पोटात जे दिसलं ते पाहून डॉक्टरही हादरले ही जागा एका पर्यटन स्थळाप्रमाणेच मॅपवर नोंदवली गेली होती. रॉरीनं डेली स्टारसोबत बोलताना सांगितलं, की टापू येथे येण्याआधी त्यांनी या जागेबाबत भरपूर अभ्यास केला होता. मात्र, तेव्हा त्यांना अशी कोणतीही जागा दिसली नव्हती. रॉरीनं म्हटलं, की मॅपवर ही गोष्ट पाहताच मी हैराण झालो.मला असा प्रश्न पडला की खरंच या जागी खूप मोठा खड्डा आहे की कोणी इथे खड्डा केला असेल. मित्रांसोबत गप्पा मारत असतानाच मोबाईलमधून निघू लागला धूर अन्..., थरारक VIDEO रॉरीनं लगेचच हे आपल्या वडिलांनाही दाखवलं. हे पाहून वडिलदेखील हैराण झाले. जेव्हा हा स्क्रीनशॉट त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला तेव्हा तो पाहून नेटकरीही थक्क झाले. यानंतर काही लोकांनी स्वतःही या जागेबाबत सर्च केलं, मात्र इतर कोणालाही ती जागा आढळली नाही. यावरुन कदाचित हे डिलीट केलं गेलं असाव, असा अंदाज लावला जात आहे.
First published:

Tags: Viral news, Viral photo

पुढील बातम्या