• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • बापरे! युवकानं पूर्ण Nokia 3310 फोनच गिळला; स्कॅनमध्ये पोटात जे दिसलं ते पाहून डॉक्टरही हादरले

बापरे! युवकानं पूर्ण Nokia 3310 फोनच गिळला; स्कॅनमध्ये पोटात जे दिसलं ते पाहून डॉक्टरही हादरले

डॉक्टरांना फोन आला, की एका व्यक्तीनं काहीतरी वस्तू गिळली आहे. स्कॅनमध्ये असं दिसलं, की फोन तीन भागात विभागला गेला होता.

 • Share this:
  नवी दिल्ली 06 सप्टेंबर : एका व्यक्तीनं पूर्ण नोकिया 3310 (Nokia 3310) फोन गिळला (Man Swallowed an Entire Nokia 3310 Cellphone) होता. त्याची या महिन्याच्या सुरुवातीला सर्जरी करण्यात आली. कोसोनोच्या प्रिस्टिना येथे राहणाऱ्या एका व्यक्तीनं नोकिया कंपनीकडून बनवलं गेलेलं 2000 च्या दशकातील सुरुवातीचं मॉडेल गिळून घेतलं. हे तेच मॉडेल होतं जे 2000 साली लॉन्च झाल्यानंतर ईट फोन नावानं लोकप्रिय झालं होतं. या व्यक्तीच्या पोटात हा फोन गेला आणि त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मित्रांसोबत गप्पा मारत असतानाच मोबाईलमधून निघू लागला धूर अन्..., थरारक VIDEO डॉ. तेलजाकब यांना हा फोन सुरक्षितपणे बाहेर काढण्याचं काम दिलं गेलं. या व्यक्तीचं स्कॅन आणि परीक्षण केलं गेलं. यात असं समोर आलं की फोन आणि त्याच्या बॅटरीमुळे यातील रसायनं शरीरासाठी अत्यंत घातक असून या व्यक्तीच्या जीवाला धोका आहे. सुदैवानं डॉक्टरांनी केलेली शस्त्रक्रिया यशस्वी ठरली आणि हा फोन पोटातून बाहेर काढण्यात यश आलं. सर्जरीनंतर काहीच वेळात डॉ तेलजाकू यांनी फेसबुकवर या फोनचे काही फोटो तसंच एक्स रे आणि एन्डोस्कोपीच्या कॉपी शेअर केल्या. डॉक्टरांनी माध्यमांसोबत बोलताना सांगितलं, की मला एक फोन आला, की एका व्यक्तीनं वस्तू गिळली आहे. स्कॅनमध्ये असं दिसलं, की फोन तीन भागात विभागला गेला होता. VIDEO : 180 किमी प्रतितास वेगानं धावणाऱ्या कारवर झोपला तरुण; विचित्र स्टंट भोवला तीन भागांमध्ये एक बॅटरीही होती. यामुळेच अधिक चिंता वाढली. कारण या बॅटरीचा पोटातच स्फोट होण्याचीही शक्यता होती. हा व्यक्ती पोटात दुखू लागल्यानं स्वतःच प्रिस्टिना येथील रुग्णालयात आला होता. डॉक्टर म्हणाले, त्या व्यक्तीनं हे सांगितलं नाही की त्यानं फोन का गिळला. एका छोट्या कॅमेऱ्यात रेकॉर्ड केलेल्या क्लिपमध्ये डॉक्टर आणि त्यांची टीम व्यक्तीच्या पोटात फोन शोधताना आणि बाहेर काढताना दिसत आहे.
  Published by:Kiran Pharate
  First published: