• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • युवकाच्या गळ्याभोवती कोब्र्यानं घातला विळखा अन्...; थराकाप उडवणारा VIDEO

युवकाच्या गळ्याभोवती कोब्र्यानं घातला विळखा अन्...; थराकाप उडवणारा VIDEO

व्हायरल होणाऱ्या व्हिडिओ क्ल्पिमध्ये तुम्ही पाहू शकता, की या व्यक्तीच्या गळ्याभोवती भल्यामोठ्या कोब्रा सापाने विळखा घातला आहे. हा व्यक्ती अतिशय आरामात सापांसोबत खेळताना दिसत आहे

 • Share this:
  नवी दिल्ली 18 ऑक्टोबर : कोब्रा हा केवळ अतिशय विषारी साप नाही, तर त्याची लांबीही इतर सापांच्या तुलनेत जास्त असते. सध्या सोशल मीडियावर (Social Media) कोब्राचा असा व्हिडिओ व्हायरल (Viral Video of Cobra) होत आहे, जो पाहून तुमचा थरकाप उडू शकतो. व्हिडिओमध्ये (Shocking Video) एका व्यक्तीनं आपल्या गळ्यामध्ये किंग कोब्रा साप घेतलेले दिसत आहेत. या व्यक्तीच्या गळ्यात विळखा घालून बसलेला कोब्रा अतिशय विशाल आणि भयानक दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकरी हैराण झाले आहेत. लग्नातच नवरीला उचलून त्यानं स्टेजवरून काढला पळ; VIDEO पाहून नेटकरी शॉक व्हायरल होणाऱ्या व्हिडिओ क्ल्पिमध्ये तुम्ही पाहू शकता, की या व्यक्तीच्या गळ्याभोवती भल्यामोठ्या कोब्रा सापाने विळखा घातला आहे. हा व्यक्ती अतिशय आरामात सापांसोबत खेळताना दिसत आहे. तो अतिशय प्रेमाने या सापांना स्पर्श करताना आणि खेळवताना दिसतो. मात्र, मध्येच सापाची हालचाल पाहून तो घाबरतोही.
  View this post on Instagram

  A post shared by طبیعت (@nature27_12)

  हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. व्हिडिओ पाहून अनेकजण हैराण झाले आहेत. 24 वर्षे वयात 3 लव्ह मॅरेज; बनली 7 मुलांची आई, यूट्यूबरनं सांगितली वेदनादायी कथा काहीच सेकंदांचा हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर nature27_12 नावाच्या पेजवरुन शेअर केला गेला आहे. हा व्हिडिओ लोकांच्या पसंतीस उतरत आहे. आतापर्यंत २ हजारहून अधिकांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे. अनेकांनी यावर कमेंट करत प्रतिक्रियाही दिल्या आहेत. व्हिडिओ पाहून अनेकांनी हा साप खरा आहे का, असा सवाल केला आहे. एका यूजरनं कमेंट करत म्हटलं, हा वेडेपणा आहे. सापाला चावता येतं आणि तो तेच करेल. एकदा चावेल आणि तुझा शेवट. दुसऱ्या एका यूजरनं लिहिलं, असं करून नक्की काय मिळेल? आणखी एक कमेंट करत विचारलं, की माझा विश्वास बसत नाहीये. हे खरे साप आहेत का?
  Published by:Kiran Pharate
  First published: