नवी दिल्ली 18 ऑक्टोबर : लग्नाच्या दिवशी (Wedding Day) केवळ नवरदेवच नाही तर नवरीलाही आनंदात डान्स करण्याची इच्छा असते. काही लोक आपला हा आनंद नाचून किंवा गाणं गाऊन व्यक्त करतात. नवरदेव मंडपात स्टेजवर उभा असतो, तेव्हा तो आपल्या नवरीची आतुरतेनं वाट पाहत असतो. तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की मंडपात एण्ट्री (Bride Entry) करताना नवरी डान्स (Bride Dance) करतच येते तर अनेकदा नवरदेव उचलून नवरीला स्टेजवर आणतो. सध्या लग्नातील असाच आगळावेगळा व्हिडिओ व्हायरल (Wedding Video Viral) होत आहे.
24 वर्षे वयात 3 लव्ह मॅरेज; बनली 7 मुलांची आई, यूट्यूबरनं सांगितली वेदनादायी कथा
सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये दिसतं, की नवरी स्टेजवर येताच नवरदेवाचा आनंद गगनात मावत नाही. वरमाळेचा कार्यक्रम झाल्यानंतर नवरीबाई स्टेजवर शांततेत उभा असते. इतक्यात नवरदेव स्मित हास्य देत नवरीला उचलून घेतो. यानंतर तो स्टेजवरुन फरार होतो.
View this post on Instagram
व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांना असा प्रश्न पडला की ही कसली प्रथा आहे. यात नवरदेव वरमाळेनंतर नवरीला उचलून घेऊन जातो.
नवरीनं यात लेहंगा परिधान केलेला असून लाल रंगाची ओढणी तिनं आपल्या डोक्यावरुन घेतली आहे. यामुळे नवरीचा चेहरा स्पष्ट दिसत नाहीये. इंटरनेटवर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओला लोकांची मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे. इन्स्टाग्रामवर निकाह दुपट्टा नावाच्या अकाऊंटवरुन हा व्हिडिओ अपलोड केला गेला आहे. या व्हिडिओला नेटकऱ्यांची चांगलीच पसंती मिळत आहे. अनेकांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे तसंच यावर निरनिराळ्या कमेंटही केल्या आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bridegroom, Wedding video