मुंबई 12 मार्च : सोशल मीडियावर असे काही व्हिडिओ अनेकदा पाहायला मिळतात, जे हृदय पिळवटून टाकणारे असतात. असे व्हिडीओ सोशल मीडियावर बराच काळ सर्वांची मनं जिंकतात, यूजर्सही हे व्हिडिओ वारंवार पाहतात. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे, ज्यामध्ये दोन भाऊ एकत्र दिसत आहेत. यादरम्यान मोठा भाऊ आपल्या लहान भावाचा वाढदिवस साजरा करताना दिसत आहे. तो ज्या पद्धतीने आपल्या भावाचा वाढदिवस साजरा करतो, ते पाहून सगळेच भावुक झाले. बापरे! कारमध्येही बसणार नाहीत इतके लोक एकाच बाईकवर बसले, जुगाडू Video खरं तर, सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडिओमध्ये दिसणारी मुलं अत्यंत गरिबीत जगत आहेत. यानंतरही ते आपल्या गरिबी आणि असहाय्यतेतही आनंदाने जगताना दिसतात. यावेळी लहान भावाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी केक न मिळाल्याने मोठा भाऊ भाकरीवरच दोन मेणबत्त्या लावून वाढदिवस साजरा करताना दिसतो. जे पाहून युजर्सही भावुक झाले आहेत.
सध्या सोशल मीडियावर या व्हिडिओला सगळ्यांनाच पसंती मिळत आहे. इंस्टाग्रामवर एव्हरीथिंग अबाउट नेपाळ नावाच्या पेजवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये दोन भाऊ एकत्र दिसत आहेत.ज्यादरम्यान मोठा भाऊ हातात भाकरी घेऊन लहान भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना दिसत आहे. ज्यावर हिरवी चटणी दिसते. तसंच, त्यावर दोन मेणबत्त्या दिसतात.
व्हिडिओनं यूजर्सचं मन जिंकलं आहे. व्हिडिओमध्ये दोन्ही भावांची असहायता आणि गरिबी पाहिल्यानंतर बहुतेक युजर्सचं डोळे भरून आले. वृत्त लिहिपर्यंत या व्हिडिओला १३ हजारांहून अधिक लाईक्स आणि एक लाख ५४ हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. या व्हिडिओने बहुतांश युजर्सचे लक्ष वेधून घेतले आहे. व्हिडिओ पाहून युजर्स खूप भावुक कमेंट करत आहेत. एका व्यक्तीने लिहिलं, ‘सुखासाठी पैसा महत्त्वाचा नाही.’