जाहिरात
मराठी बातम्या / Viral / बापरे! कारमध्येही बसणार नाहीत इतके लोक एकाच बाईकवर बसले, जुगाडू Video

बापरे! कारमध्येही बसणार नाहीत इतके लोक एकाच बाईकवर बसले, जुगाडू Video

व्हायरल व्हिडीओ

व्हायरल व्हिडीओ

लोक अनेक गोष्टींसाठी काही पर्याय काढताना दिसतात. जगभरात तर जुगाडुंची संख्या काही कमी नाही. प्रत्येक गोष्टीसाठी लोकांकडे जुगाड उपलब्ध असतो.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

नवी दिल्ली, 11 मार्च : लोक अनेक गोष्टींसाठी काही पर्याय काढताना दिसतात. जगभरात तर जुगाडुंची संख्या काही कमी नाही. प्रत्येक गोष्टीसाठी लोकांकडे जुगाड उपलब्ध असतो. त्यांचे हटके जुगाडू व्हिडीओदेखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतात. कोण कधी काय जुगाड करेल याचा काही नेम नाही. आपण विचारही करु शकत अशा गोष्टींसाठी लोक जुगाड करतात. असाच एक जुगाडू व्हिडीओ सध्या समोर आला आहे. जुगाडबाज लोकांना कमी संसाधनांमध्ये जास्तीत जास्त परिणाम हवे असतात आणि यालाच आपण जुगाड म्हणतो. प्रत्येकजण हे तंत्रज्ञान वापरू शकत नाही. आता तुम्ही बाईकवर तीन-चार जणांना स्वार होताना पाहिलं असेल, पण सध्या समोर आलेला व्हिडीओ पाहून थोडं आश्‍चर्यच आहे कारण इथे एक-दोन नाही तर आठ जण बाईकवरून प्रवास करताना दिसतात. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय.

जाहिरात

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, व्यक्तीने जुगाड करत आपल्या गाडीचे सीट बदलले आणि जास्त लांब केले. जेणेकरून अधिकाधिक लोक त्यावर बसावेत. व्हिडीओमध्ये आठ लोक गाडीवर बसतातही. हा व्हिडीओ @rupin1992 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. अगदी काही वेळात हा व्हिडीओ इंटरनेटवर तुफान व्हायरल जाला. व्हिडीओवर भरपूर कमेंटदेखील येत आहेत.

News18लोकमत
News18लोकमत

दरम्यान, सोशल मीडियावर असे जुगाडू व्हिडीओ कायमच फिरत असतात. लोक जुगाड करुन काहीही करताना दिसतात. कधी कधी या जुगाडू व्हिडीओंची मजा घेतली जाते तर काही खरोखरंच कौतुकास्पद असतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात