मराठी बातम्या /बातम्या /Viral /

चमत्कार की नशीब? 5 वर्षांच्या चिमुकल्याच्या अंगावरून गेली गाडी पण साधं खरचटलंही नाही; पाहा VIDEO

चमत्कार की नशीब? 5 वर्षांच्या चिमुकल्याच्या अंगावरून गेली गाडी पण साधं खरचटलंही नाही; पाहा VIDEO

चिमुकल्याच्या अपघाताचं दृश्यं कॅमेऱ्यात कैद

चिमुकल्याच्या अपघाताचं दृश्यं कॅमेऱ्यात कैद

चिमुकल्याच्या अपघाताचं दृश्यं कॅमेऱ्यात कैद

  • Published by:  Priya Lad

बीजिंग, 12 ऑक्टोबर : एखाद्या मोठ्या व्यक्तीला गाडीने धडक दिल्यानंतर ती व्यक्ती गाडीच्या खाली आल्यावर तिची काय अवस्था होईल याची कल्पनाही आपण करू शकत नाही (Horrible Accident). मग अवघ्या पाच वर्षांच्या चिमुरड्याच्या (Child) अंगावरून गाडी गेली, मग काय झालं असावं? असाच हा श्वास रोखून धरायला लावणारा व्हिडीओ समोर आला आहे (Child survived in accident).

चीनमधील (China)  एका पाच वर्षांच्या मुलाच्या अपघाताचा हा धक्कादायक व्हिडीओ आहे. रस्ता ओलांडताना या चिमुकल्याला एका भरधाव गाडीने उडवलं. त्या चिमुकल्याच्या अंगावरूनसुद्धा ही गाडी गेली. पण यानंतर पुढे जे घडलं ते यापेक्षाही शॉकिंग पण जीवात जीव आणणारं होतं. इतकी मोठी गाडी या चिमुकल्याच्या अंगावरून गेली पण या चिमुकल्याला साधं खरचटलंही नाही. हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतो आहे.

हे वाचा - कुत्र्यासाठी त्याने भरधाव ट्रेनसमोर मारली उडी आणि...; धडकी भरवणारा VIDEO

डेली मेलच्या रिपोर्टनुसार अनुहई प्रांतातील बोझोऊ शहरातील हा व्हिडीओ आहे. हा मुलगा रस्त्याच्या एका कडेला उभा होता. तिथं त्याचे वडीलही काहीतरी काम करत उभे होते. तर रस्त्याच्या पलिकडे मुलाची आई उभी होती. मुलाला तिच्याकडे जायचं होतं. यासाठी त्याला रस्ता ओलांडायचा होता. रस्त्यावर आधीपासूनच एक गाडी उभी आहे. त्यामुळे त्याच्या पलिकडून जाणारी वाहनं दिसत नाही. मुलगा रस्ता ओलांडण्याच्या तयारीत असताना त्याच्यासमोरून एक गाडी जाते आणि त्यानंतर तो रस्त्यावरून पलिकडे जाण्यासाठी धावत सुटतो. त्याचवेळी दुसरी गाडी मागून येते आणि त्याला उडवते.

ही कंबाईन हार्वेस्टर होती, जी शेतीच्या कामात वापरली जाते. या गागाडीला जेसीबासारखं माती उचलण्यासाठीचा एक भाग आहे. याच भागाला मुलगा धडकतो आणि रस्त्यावर पडतो. गाडी इतकी वेगात होती की ती त्या मुलावरूनच पुढे निघून जाते. गाडीखाली आपल्या मुलाला गेलेलं पाहून त्याचे आईवडीलही मोठ्याने ओरडतात. गाडी पुढे जाताच ते आपल्या मुलाच्या दिशेने धावत जातात आणि मुलाला उचलतात.

हे वाचा - Bungee Jumping करताना दोरी तुटल्यानं महिलेचा मृत्यू, Shocking Video

सुदैवानं  मुलगा एकदम सुखरूप असतो. त्याला काहीही झालेलं नसतं. गाडीने धडक देताच मुलगा गाडीच्या मधोमध पडतो. ज्यामुळे गाडीची चाकं त्याच्या आजूबाजूला असता ती त्याच्यावरून जात नाहीत. गाडी जाईपर्यंत मुलगाही तसाच गाडीच्या खाली हालचाल न करता राहतो. पण या संपूर्ण घटनेमुळे तो घाबरला आहे.

First published:

Tags: Accident, China