मराठी बातम्या /बातम्या /Viral /डान्सिंग टॅलेंट दाखवणाऱ्या तरुणासोबत घडलं भलतंच; मजेशीर VIDEO पाहून पोट धरून हसाल

डान्सिंग टॅलेंट दाखवणाऱ्या तरुणासोबत घडलं भलतंच; मजेशीर VIDEO पाहून पोट धरून हसाल

काहीच सेकंदाचा हा व्हिडिओ एखाद्या कार्यक्रमातील असल्याचं जाणवतं. यात दोन मुलं स्टेजवर डान्स करत असल्याचं दिसतं. यादरम्यान एक मुलगा आपलं डान्सिंग टॅलेंट दाखवण्याचा प्रयत्न करतो

काहीच सेकंदाचा हा व्हिडिओ एखाद्या कार्यक्रमातील असल्याचं जाणवतं. यात दोन मुलं स्टेजवर डान्स करत असल्याचं दिसतं. यादरम्यान एक मुलगा आपलं डान्सिंग टॅलेंट दाखवण्याचा प्रयत्न करतो

काहीच सेकंदाचा हा व्हिडिओ एखाद्या कार्यक्रमातील असल्याचं जाणवतं. यात दोन मुलं स्टेजवर डान्स करत असल्याचं दिसतं. यादरम्यान एक मुलगा आपलं डान्सिंग टॅलेंट दाखवण्याचा प्रयत्न करतो

नवी दिल्ली 27 सप्टेंबर : सोशल मीडियावर (Social Media) सतत लग्नसमारंभातील मजेशीर व्हिडिओ व्हायरल (Funny Wedding Videos) होत राहतात. यातील काही व्हिडिओ इतके खास असतात की वारंवार पाहिले जातात. इतकंच नाही तर अनेकजण हे व्हिडिओ शेअरही करत असतात. यातील काही व्हिडिओ असे असतात जे पाहून हसू आवरत नाही. सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत आहे. यात एक मुलगा स्टेजवर आपलं डान्सिंग टॅलेंट (Dancing Talent) दाखवताना दिसत आहे. मात्र पुढच्याच क्षणी त्याच्यासोबत असं काही घडलं जे पाहून तुम्हीही पोट धरून हसाल.

Porn Addict पतीच्या सवयीला कंटाळून महिलेनं घेतला मोठा निर्णय; सुरू केलं हे काम

सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर लोक लग्न, डान्स, स्टंट आणि इतरही मजेशीर व्हिडिओ शेअर करत राहतात. यात विशेषतः डान्सचे व्हिडिओ लोकांच्या अधिक पसंतीस उतरतात. इंटरनेटवर डान्स व्हिडिओ (Dance Video) पोस्ट करून अनेक लोक रातोरात प्रसिद्धी मिळवतात. सध्या डान्सचा असाच आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही.

काहीच सेकंदाचा हा व्हिडिओ एखाद्या कार्यक्रमातील असल्याचं जाणवतं. यात दोन मुलं स्टेजवर डान्स करत असल्याचं दिसतं. यादरम्यान एक मुलगा आपलं डान्सिंग टॅलेंट दाखवण्याचा प्रयत्न करतो. मात्र, त्यानंतर जे काही घडतं त्याचा विचारही त्यानं केला नसेल. हा मुलगा मागे लावण्यात आलेल्या पडद्यात गुंततो आणि धाडकन स्टेजवर कोसळतो. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की फ्लिप करताना या मुलाचा पाय पडद्यात अडकतो आणि तो कोसळतो.

चवताळलेल्या हत्तीचा बसवर हल्ला; आधी काचा फोडल्या अन् मग.., पाहा VIRAL VIDEO

हा मजेशीर व्हिडिओ इन्स्टाग्रामवर official_viralclips नावाच्या अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे. हा व्हिडिओ इन्स्टाग्राम यूजर्सच्या पसंतीस उतरत आहे. व्हिडिओला तीन हजारहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. हा आकडा वाढतच आहे. अनेकांनी या व्हिडिओवर मजेशीर कमेंटही केल्या आहेत. एका यूजरनं कमेंट करत म्हटलं, की भाऊ पडद्यानं तुझं काय वाईट केलं होतं. इतरही अनेकांनी यावर मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

First published:

Tags: Dance video, Funny video, Stunt video