नवी दिल्ली 27 सप्टेंबर : हत्तींची गणना जगातील सर्वात समजदार प्राण्यांमध्ये होते. त्यांच्या समजूचदारपणाचे अनेक किस्से सोशल मीडियावर व्हायरल (Viral on Social Media) होत असतात. मात्र, हा प्राणी तितकाच रागीटही असतो. हत्तीच्या रागासमोर अगदी सिंहदेखील हार मानतो. अनेकदा माणसांनाही हत्तीच्या रागाचा सामना करावा लागतो. सध्या असाच एक व्हिडिओ समोर आला (Elephant Attacks Bus) आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हाला हत्तीच्या रागाचा अंदाज (Angry Elephant Video) येईल.
'सेकंड हँड जवानी' गाण्यावर मंदिरात तरुणीचा धुमाकूळ; Video आल्यानंतर परिसरात खळबळ
ही घटना नीलगिरी येथील असल्याचं समोर आलं आहे. यात एका चालकानं अतिशय समजदारीनं चवताळलेल्या हत्तीला शांत केलं. त्यानं अतिशय शांतपणे ही परिस्थिती हाताळली आणि प्रवशांना सुरक्षित ठेवलं. या घटनेचा व्हिडिओ भारतीय वन सेवा अधिकारी (IFS) सुप्रिया साहू यांनी शेअर केला आहे
Huge respect for the driver of this Government bus in Nilgiris who kept his cool even under the terrifying hits on the bus from an agitated tusker.He helped passengers move back safely, in an incident today morning. Thats why they say a cool mind works wonders VC- by a friend pic.twitter.com/SGb3yqUWqK
— Supriya Sahu IAS (@supriyasahuias) September 25, 2021
व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलं की, नीलगिरीच्या या सरकारी बस चालकाचा आदर करते. हत्तीनं जोरजोरात हल्ला करत बसची काच फोडूनही या चालकानं अतिशय संयमानं परिस्थिती हाताळली. कदाचित यामुळेच असं म्हटलं जातं, की डोकं शांत असेल तर कोणत्याही परिस्थितीतून बाहेर पडता येतं.
भारतीयांच्या टॅलेंटला तोड नाही! इटालीयन पिझ्झाचा देशी अवतार, तुम्हीच पाहा VIDEO
बातमी देईपर्यंत हा हैराण करणारा व्हिडिओ (Twitter Video) 57 हजारहून अधिकांनी पाहिला आहे. साडेतीन हजारहून अधिकांनी लाईक केला आहे. तर 500 हून अधिकांनी रिट्विट केला आहे. या व्हिडिओवर अनेकांनी कमेंटही केल्या आहेत. एका यूजरनं लिहिलं, शांत डोक्यानं घेतलेला निर्णय नेहमी योग्यच असतो. दुसऱ्या एका यूजरनं लिहिलं, की चालकानं अतिशय शांत डोक्यानं निर्णय घेतला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Elephant, Shocking video viral