मराठी बातम्या /बातम्या /Viral /

लग्नातील मस्ती नवरीबाईला पडली भारी, नवरदेवही वाचवूू शकला नाही; VIDEO VIRAL

लग्नातील मस्ती नवरीबाईला पडली भारी, नवरदेवही वाचवूू शकला नाही; VIDEO VIRAL

लग्नात नवरीबाई नवरदेवासोबत मस्ती करायला गेली आणि...

लग्नात नवरीबाई नवरदेवासोबत मस्ती करायला गेली आणि...

लग्नात नवरीबाई नवरदेवासोबत मस्ती करायला गेली आणि...

  • Published by:  Priya Lad

मुंबई, 26 ऑक्टोबर : लग्न (Wedding) म्हटलं की धम्माल, मजामस्ती (Wedding video viral). फक्त दीर, मेहुणी, नातेवाईक, पाहुणेच नाही तर अगदी नवरा-नवरीही (Bride groom video) आता लग्नाची मजा लुटताना दिसतात. नवरा-नवरीचे फक्त रोमँटिक नाही तर मजेशीर क्षणही पाहायला मिळतात. सध्या अशाच एका लग्नाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ज्यात नवरीबाई लग्नात नवरदेवासोबत मस्ती करताना दिसली. पण तिची ही मस्ती तिला चांगलीच महागात पडली.

बदलत्या काळानुसार लग्नाच्या विधी, परंपरांमध्येही थोडेफार बदल झालेले पाहायला मिळतात. त्यापैकीच एक म्हणजे वरमाला. पूर्वी वरमाला घालताना नवरा-नवरी मान खाली घातलेले दिसत. हळूच नजर वर करून एकमेकांना पाहून लाजत असत. पण आता मात्र दोघंही बिनधास्तपणे वरमाला घालतात नाही तर मजाही करताना दिसतात.

View this post on Instagram

A post shared by Bhutni_ke (@bhutni_ke_memes)

व्हिडीओत पाहू शकता नवरा-नवरी स्टेजवर एकमेकांसमोर उभे आहेत. वरमालाची विधी सुरू आहे. यावेळी नवरीबाई नवरदेवासोबत मस्ती करताना दिसते आणि ही मस्ती तिला चांगली महागात पडते.

हे वाचा - नवरीबाईचा तो डान्स पाहून रूसला नवरदेव; पाहुणेही अवाक होऊन बघत राहिले, VIDEO

सुरुवातीला नवरी नवरदेवाला वरमाला घालते. त्यावेळी नवरदेव किंचितशी आपली मान मागे करतो. पण नवरी त्याला वरमाला घालते. त्यानंतर जेव्हा नवरदेव वरमाला घालायला जातो तेव्हा नवरी उड्याच मारू लागते. नवरदेवाला ती वरमाला घालू देत नाही. उड्या मारत मारत ती मागे जाते आणि तिचा तोल ढासळतो. ती धाडकन स्टेजवरून खालीच कोसळते. नवरदेव नवरीला पकडायला जातो पण त्याआधीच नवरी खाली पडते. नवरदेवही तिला पडण्यापासून वाचवू शकला नाही.

हे वाचा - अरे यांना आवरा! लग्नातच भिडले वधू आणि वरपक्ष, बुटासाठी घातला राडा; VIDEO VIRAL

भूतनी के मिम्स इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहून थोडा धक्का बसतोच पण हसूही आवरता येत नाही.

First published:

Tags: Bride, Bridegroom, Viral, Viral videos, Wedding video