शिमला, 31 जुलै : हिमाचल प्रदेशातील लाहोर स्पीतिमधील चंद्रताल तलाव पाहण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक येतात. या तलावात पोहण्यास मनाई आहे. बाहेरुन लहान वाटत असली तरी हा तलाव खोल असल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे पर्यटकांना तलावामध्ये आत जाण्यास आणि पोहोण्यास मनाई आहे. मात्र तरीही अनेक पर्यटक नियम न जुमानता येथे पोहोण्यासाठी तलावात जातात. असाच एक प्रकार घडला आणि यात 40 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. या घटनेचा एक व्हिडीओ समोर आला आहे.
धक्कादायक बाब म्हणजे ही व्यक्ती बुडत असताना अनेक पर्यटक किनाऱ्याजवळ उभे होते. मात्र कोणीच त्याला वाचवू शकलं नाही. मिळालेल्या माहितीनुसार, येथे आलेला एक पर्यटक किनाऱ्यावरुन एक व्हिडीओ शूट करीत होता. दरम्यान एक व्यक्ती तलावात बुडत असल्याचं त्याच्या मोबाइलमध्ये कैद झालं. तेथे उभे असलेल्या नागरिकांनी त्याला वाचविण्याचे अनेक प्रयत्न केले. मात्र त्याचा जीव वाचवू शकले नाही.
हे ही वाचा-पाहता पाहता पत्त्यांसारखा दरीत कोसळला भला मोठा ट्रक; Shocking Video
या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसत आहे की, काही वेळाने गोताखोर तेथे आला व त्याने पहिल्याच प्रयत्नात मृतदेह बाहेर काढला. या व्यक्तीचं नाव राहुल ठाकूर असल्याचं समोर आलं आहे. ही व्यक्ती कुल्लू येथे राहते. राहुल आपल्या चार मित्रांसह चंद्राताल फिरण्यासाठी आला होता. 22 जुलै रोजी सकाळी आंघोळ करण्यासाठी राहुल तलावात गेला आणि बुडला. राहुलचा मृतदेह तलावापासून 20 फूट अंतरावर होता. हे तलाव 18 फूट खोल असल्याचं सांगितलं जात आहे. गोताखोराने मृतदेह बाहेर काढला. यानंतर पोलिसांनी मृतदेह आपल्या ताब्यात घेतला आहे.
पर्यटनाच्या ठिकाणी वारंवार अशा घटना समोर येत आहे. सध्या पावसाचं उधान असल्याने अशा प्रकारे धाडस करणं जीवावर बेतू शकतं. त्यामुळे पावसाळ्यात कोणत्याही ठिकाणी पर्यटनासाठी गेल्यावर नको ते धाडस करू नये. अन्यथा त्याचे भयावह परिणाम भोगावे लागू शकतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.