Home /News /viral /

उधाणलेल्या पाण्यातून जखमी तरुणाला स्ट्रेचरवरुन नेताना एकाचा पाय घसरला आणि...Shocking Video

उधाणलेल्या पाण्यातून जखमी तरुणाला स्ट्रेचरवरुन नेताना एकाचा पाय घसरला आणि...Shocking Video

एक तात्पुरती रश्शी घेऊन जखमी तरुणाला दुसऱ्या बाजूला नेलं जात होतं. खाली पाणी अत्यंत वेगाने वाहत होतं.

    हिमाचल प्रदेश, 31 जुलै : देशभरातील विविध राज्यांमध्ये सध्या पावसाचं धुमशान सुरू आहे. अशावेळी अनेक गावांमध्ये पुरपरिस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी सर्वसामान्यांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. दरम्यान हिमाचल प्रदेशातून (Himachal Pradesh) एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. हिमाचल प्रदेशातील लाहौल स्पीति (Lahaul Spiti) मध्ये मुसळधार पावसाचे फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत. हे सर्व दृश्य चिंता वाढवणारे आहेत.(Shocking Video) शुक्रवारी येथे अडकलेले तब्बल 150 जणांना सुखरुप बाहेर काढण्यात आलं आहे. लाहाॅल-स्पीतिच्या तिंदी भागातील बस स्टँडजवळ झालेल्या अपघातात (Road Accident) जखमी झालेल्या तरुणाला वेगाने वाहणाऱ्या नाल्यातून रश्शीच्या साहाय्याने बाहेर काढण्यात आलं. याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये लोक जखमी तरुणाला बाहेर काढण्याचा प्रयत्न करीत असल्याचं दिसत आहे. जखमी तरुणाला उपचारासाठी कुल्लू रुग्णालयात (Kullu Hospital) पाठविण्यात आलं आहे. हे ही वाचा-पाहता पाहता पत्त्यांसारखा दरीत कोसळला भला मोठा ट्रक; Shocking Video चारचाकी गाडीच्या अपघातात 18 वर्षी जतीन गंभीर जखमी झाला. यानंतर त्याला उदयपूर रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. यानंतर त्याला कुल्लूला हलविण्यात आलं. या नाल्यापर्यंत जतीनला गाडीने आणण्यात आलं. तेथून अत्यंत अवघड परिस्थितीत त्याना नाल्याच्या पलीकडे पोहोचविण्यात आलं. ही दृश्य पाहून तुमच्या अंगावर काटा उभा राहिल. येथे नागरिकही स्वत:चा जीव धोक्यात घालून जखमी तरुणाला रुग्णालयात पोहोचविण्यासाठी प्रयत्न करीत होते. दरम्यान एकाचा अचानक पाय घसरल्याचं दिसून येत आहे. तर वाढत्या पाण्याच्या प्रवाहामुळे काही जणं त्यात वाहून जात असल्याचंही दिसत आहे. मात्र सुदैवाने ती व्यक्ती बचावली आहे. जखमी तरुणासाठी अनेकजणं पुढे आले होते. खाली मात्र उधाणलेलं पाणी अत्यंत जलद गतीने वाहताना दिसत आहे. ही दृश्य पाहून अंगावर काटा उभा राहिल.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Shocking viral video, Viral video.

    पुढील बातम्या