Home /News /viral /

दिखाव्याच्या नादात तरुणासोबत भलतंच घडलं; BMW मधून पडून थेट रस्त्यावर आपटला, पाहा VIDEO

दिखाव्याच्या नादात तरुणासोबत भलतंच घडलं; BMW मधून पडून थेट रस्त्यावर आपटला, पाहा VIDEO

    नवी दिल्ली 18 एप्रिल : आजकाल तरुणांमध्ये स्टंटचं (Stunt) क्रेज मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी लोक कोणत्याही थराला जायला तयार असतात. अनेकदा तर ते आपल्या जिवाचीही पर्वा न करता असे स्टंट करतात जे पाहूनही थरकाप उडतो. मात्र, प्रत्येकवेळी हा स्टंट यशस्वी होतोच असं नाही. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Shocking Accident Video) होत आहे. बंद पडलेला TV सुरू करण्यासाठी भयंकर जुगाड; हातात काठी घेतली अन्..., VIDEO चा शेवट पाहून व्हाल अवाक व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक ब्रिटीश व्यक्ती कन्व्हर्टेबल बीएमडब्ल्यू कारमधून पडताना दिसतो. हा व्यक्ती यूकेमध्ये कार मीटअपमध्ये स्टायलिश दिसण्याचा प्रयत्न करत होता. वृत्तानुसार, ही घटना यूकेच्या वारविक येथील ब्रिटिश मोटर म्युझियममध्ये आयोजित अल्टिमेट बीएमडब्ल्यू कार मीटमध्ये घडली. या प्रसंगी BMW चे अनेक चाहते जमले होते, जे कन्वर्टिबल कार पाहण्यासाठी उत्सुक होते. मात्र, BMW ब्लॅक कन्व्हर्टिबल ड्रायव्हर जरा जास्तच उत्साही झाला आणि दिखाव्याच्या नादात भलतंच घडलं (Boy Falls from BMW Car). व्हिडिओमध्ये चार मित्र ट्रेंडी BMW M4 मध्ये कार्यक्रमस्थळी फिरताना दिसत आहेत. यातील काळे कपडे घातलेला एक तरुण कन्वर्टिबल BMW च्या मागील सीटवर बसलेला दिसतो. स्पीड ब्रेकर ओलांडल्यानंतर ड्रायव्हरने ताबडतोब कारचा वेग वाढवला. ज्यामुळे मागील बाजूचा बसलेला तरुण गाडीमधून उडून ठेव रस्त्यावर पडतो. व्हिडिओमध्ये दिसतं की यानंतर त्याला लाज वाटते आणि लगेचच तो उठून उभा राहातो. तर त्याचे मित्रही कार थांबवतात. 14 सेकंदाचा हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. VIDEO: महिलेकडून भररस्त्यात फूड डिलिव्हरी बॉयला चपलेनं जबर मारहाण; नेमकं काय आहे प्रकरण? हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर झाल्यानंतर व्हायरल झाला आहे. लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आणि हसणाऱ्या इमोजीसह कमेंट्स केल्या. व्हिडिओ शेअर केल्यानंतर त्याला YouTube वर हजारो व्ह्यूज तसेच हजारो लाईक्स आणि कमेंट्स मिळाल्या आहेत. व्हिडिओवरील कमेंट्समध्ये काही लोकांनी हा तरुण ठीक आहे की नाही, अशी विचारणा केली आहे. तर काही लोकांनी सांगितलं की मुलगा शो ऑफच्या नादात पडला आहे.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Shocking accident, Viral video on social media

    पुढील बातम्या