मराठी बातम्या /बातम्या /Viral /

नवरी-नवरदेवाला इम्प्रेस करायला गेला अन् झाला पोपट; लग्नाच्या स्टेजवरच आपटला तरुण, मजेशीर VIDEO

नवरी-नवरदेवाला इम्प्रेस करायला गेला अन् झाला पोपट; लग्नाच्या स्टेजवरच आपटला तरुण, मजेशीर VIDEO

या व्हिडिओमध्ये दिसतं की लग्नाच्या स्टेजवर एक तरुण नवरी आणि नवरदेवाला शुभेच्छा देण्यासाठी पोहोचतो. या जोडप्याला सरप्राईज देण्यासाठी तो वेगळ्या अंदाजात शुभेच्छा देण्याचा प्रयत्न करतो

  नवी दिल्ली 07 जानेवारी : लग्नसमारंभात नवरी आणि नवरदेवासमोर स्टंट करणाऱ्यांना अनेकदा ही स्टंटबाजी चांगलीच महागात पडते. छोट्याशा चुकीमुळेही त्यांचा स्टंट फेल होतो आणि सर्वांसमोर चे मस्करीचा विषय ठरतात. सध्या एक असाच व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल (Stunt on Wedding Stage) होत आहे. या व्हिडिओमध्ये दिसतं की लग्नाच्या स्टेजवर एक तरुण नवरी आणि नवरदेवाला शुभेच्छा देण्यासाठी पोहोचतो. या जोडप्याला सरप्राईज देण्यासाठी तो वेगळ्या अंदाजात शुभेच्छा देण्याचा प्रयत्न करतो. पहिल्यांदा तो यात सफलही होतो, मात्र दुसऱ्यांदा त्याच्यासोबत भलतंच काही घडतं. या घटनेचा मजेशीर व्हिडिओ व्हायरल (Funny Stunt Video Viral) झाला आहे. VIDEO : स्कूटी चालवायला शिकत होती तरुणी; अचानक रेस वाढवली अन्... सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये दिसतं की लग्नसमारंभ सुरू आहे. फ्रेममध्ये स्टेज दिसत असून नवरी-नवरदेव इथेच उभा आहेत, याशिवाय आजूबाजूला इतरही काही लोक उभे आहेत. इतक्यात स्टेजवर एका तरुणाची एन्ट्री होते. त्याच्या हातात एक फूल असतं. हे फूल सरळ नवरदेव-नवरीच्या हातात न देता, तो एकदा फ्लिप मारतो. त्याचा फ्लिप पाहून नवरदेवही शॉक होतो. मात्र हा तरुण इथेच थांबत नाही. यानंतर तो आणखी एक फ्लिप मारण्याचा प्रयत्न करतो. यावेळी तो उलटी फ्लिप ट्राय करतो. मात्र, यावेळी त्याच्यासोबत भलतंच काही घडतं.
  दुसऱ्यांदा उलटी फ्लिप मारताना हा तरुण स्टेजवर ठेवलेल्या एका खुर्चीला धडकतो आणि खाली कोसळतो. हे पाहून नवरी आणि नवरदेवासह स्टेजवर उपस्थित इतर लोकही हसू लागतात. लग्नाच्या स्टेजवरील हा मजेशीर व्हिडिओ पाहून नेटकरीही खळखळून हसत आहेत. VIDEO - मैत्रिणीने अचानक सर्वांसमोरच दिलं गिफ्ट; नवरीबाईच नाही तर नवरदेवही लाजला अवघ्या काहीच सेकंदाचा हा व्हिडिओ आतापर्यंत जवळपास 3 लाख 76 हजारहून अधिकांनी पाहिला आहे. लोक हा व्हिडिओ इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही शेअर करत आहेत. अनेकांनी हा व्हिडिओ लाईकही केला आहे. व्हिडिओवर अनेक यूजर्सनी मजेशीर कमेंटही केलेल्या दिसत आहेत.
  Published by:Kiran Pharate
  First published:

  Tags: Funny video, Stunt video

  पुढील बातम्या