नवी दिल्ली, 19 जून : सोशल मीडियावर कायम खरतनाक स्टंटचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. असाच एक थरकाप उडवणारा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक मुलगा डोंगराच्या अगदी टोकाशी उभा राहून बॅक फ्लिप मारताना दिसत आहे. मुळातच बॅक फ्लिप मारणं सोपं काम नसतं, त्यात या पठ्ठ्या डोंगराच्या अगदी टोकाशी उभा राहून हा खतरनाक स्टंट करत आहे. हा व्हिडीओ व्हायरस झाल्यानंतर या मुलाचे कौतुक नाही तर त्यावर टीका केली जात आहे. प्रसिद्ध उद्योगपती गर्ष गोएंका यांनीही या मुलाचा व्हिडीओ शेअर केला, या मुलांना केलेल्या स्टंटची प्रशंसा करावी की त्याला मूर्ख म्हणावं, असे लिहिले. हा व्हिडीओ गेल्या वर्षी टीकटॉवर शेअर करण्यात आला होता. मात्र सध्या हा व्हिडीओ ट्विटरवर व्हायरल होत आहे. वाचा- VIDEO: इमारतीच्या 32व्या मजल्यावर खेळत होती लहान मुलं, एक खाली घसरला आणि…
Just wondering if his act is to be admired or considered as stupidity !pic.twitter.com/HLsqAy6UBY
— Harsh Goenka (@hvgoenka) June 16, 2020
या व्हिडीओमध्ये पाहता येईल की ती व्यक्ती डोंगराच्या टोकावर उभा राहिलेला आहे. अगदी टोकावर उभा राहून बॅक फ्लिप मारली. हा व्हिडीओ स्लो मोशनमध्ये शूट करण्यात आला आहे. त्यानं हा स्टंट यशस्वीरित्या पूर्ण केला खरा. मात्र लोकांनी त्यानं घेतलेल्या रिस्कवर टीका केली आहे. वाचा- साडीमध्ये बॅक फ्लिप? तरुणीनं केला जबरदस्त स्टंट, VIDEO पाहून व्हाल शॉक
Maha Stupidity of Export Quality!!
— Adnan Sami (@AdnanSamiLive) June 17, 2020
This clip should be used as part of an Anti-Weed advert!
वाचा- पार्सल चोरण्यासाठी आलेल्या चोरानं डिलिव्हरी बॉयला मारली मिठी, पुढे काय घडलं पाहा तर काही युझरनं त्याचे कौतुक केले आहे. त्याला रिस्कटेकर म्हटलं आहे तर काहींनी तो स्टंटमेकर अजून त्यानं योग्यती काळजी घेतली असल्याचे म्हटलं आहे.
दरम्यान, या व्हिडीओमध्ये दिसत असलेला स्टंट अजिबात करू नका. कारण हा स्टंट तज्ज्ञांच्या देखरेखीखाली करण्यात आला आहे. वाचा- VIDEO : अगदीच अनपेक्षित मृत्यू! बँकेत काचेच्या दरवाजाला धडकली महिला आणि…