Home /News /viral /

पार्सल चोरण्यासाठी आलेल्या चोरानं डिलिव्हरी बॉयला मारली मिठी, पुढे काय घडलं पाहा VIDEO

पार्सल चोरण्यासाठी आलेल्या चोरानं डिलिव्हरी बॉयला मारली मिठी, पुढे काय घडलं पाहा VIDEO

चोरांसमोर रडला कोरोना वॉरियर डिलिव्हरी बॉय, या चोरांनी काय केलं पाहा VIDEO

    मुंबई, 18 जून : सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. कधी प्राण्यांचे तर काही अजब व्हिडीओ व्हायरल होत आहेत. चोर आपलं काम खूप मन लावून आणि पूर्ण मेहनतीनं करतो. चोरीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. पाकिस्तानमधील कराचीमधील चोरीची अजब घटना समोर आली आहे. गल्फ न्यूजच्या वृत्तानुसार एका पार्सलची डिलिव्हरी देण्यासाठी तरुण घराबाहेर पोहोचतो. त्याचवेळी दुचाकीवरून दोन चोर येतात. पार्सल पाहून त्यांना चोरण्याची इच्छा होते. पार्सल चोरी करण्यासाठी त्यातला एक तरुण दुचाकीवरून उतरतोही आणि पुढे येतो. हा चोर चोरी करून पळ काढण्याऐवजी या सीसीटीव्हीमध्ये त्या तरुणासोबत बोलताना दिसत आहे. हा डिलिव्हरी बॉय चोरांना काहीतरी सांगतो आणि रडायला सुरुवात करतो. त्याची ही अवस्था पाहून चोरी करणाऱ्यांचं मन बदलतं आणि ते पार्सल परत करून त्याला मिठी मारून निघून जातात. चोर चोरी करून निघाल्याच्या अनेक घटना आपण सीसीटीव्हीत कैद झाल्याच्या पाहिल्यात पण असे अजब चोरीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. पाकिस्तानातील स्थानिक मीडियानं दिलेल्या वृत्तानुसार या चोरांनी आधी या डिलिव्हरी बॉयला धमकवण्याचा प्रयत्न केला. मात्र तरुण जोरजोरात रडायला लागल्यानंतर त्याची समजूत काढली. त्याची अवस्था पाहून चोरांनी सगळ्या किमती वस्तू परत केल्या त्याला मिठी मारून निघाले. कोविड -19 दरम्यान, जिथे लोक घरी असतात तिथे काही लोक असे असतात जे बाहेर जाऊन लोकांची सेवा करत असतात. त्याला भारतासह अनेक देशांमध्ये कोरोना वॉरियर्स म्हटले जाते. फूड डिलिव्हरी मुले देखील अशा वातावरणात काम करतात आणि लोकांना मदत करतात. हे वाचा-…आणि जवानांनी चक्क गाण्याच्या तालावर केलं ट्रेनिंग, हा भन्नाट VIDEO एकदा पाहाच हे वाचा-धक्कादायक! रेल्वेसमोर उडी मारण्याआधी मुलीने केला TikTok VIDEO संपादन- क्रांती कानेटकर
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    पुढील बातम्या