साडीमध्ये बॅक फ्लिप? तरुणीनं केला जबरदस्त स्टंट, VIDEO पाहून व्हाल शॉक

साडीमध्ये बॅक फ्लिप? तरुणीनं केला जबरदस्त स्टंट, VIDEO पाहून व्हाल शॉक

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर एकच प्रश्न तुम्हाला पडेल, हे खरच शक्य आहे?

  • Share this:

मुंबई, 16 जून : सध्याच्या काळात इंटरनेटवर एखादा व्हिडीओ जरी अपलोड केला तरी संबंधित व्यक्ती स्टार होऊन जाते. म्हणजे उदाहरणार्थ डब्बू अंकल, अरमान राठोड किंवा बाबा जॅक्शन, यांचं टॅलेंट लोकांसमोर आलं ते, तेवळ सोशल मीडियावरमुळं. अशाच एक बॅक फ्लिप तरुणीची सोशल मीडियावर चर्चा होत आहे. या तरुणीनं चक्क साडीमध्ये बॅक फ्लिप केलं आहे.

या तरुणीचा व्हिडीओ 13 जून रोजी ट्विटरवर एका युझरनं पोस्ट केला. या व्हिडीओमध्ये पायात शूज किंवा ट्रेनिंग शिवाय ही तरुणी बॅक फ्लिप मारताना दिसत आहे. मुख्य म्हणजे या तरुणीनं साडीमध्ये बॅक फ्लिप मारली आहे. स्लो मोशनमध्ये हा व्हिडीओ शूट करण्यात आला आहे.

वाचा-VIDEO: इमारतीच्या 32व्या मजल्यावर खेळत होती लहान मुलं, एक खाली घसरला आणि...

वाचा-डोळ्यांत पाणी आणेल हा मैत्रिचा VIDEO, मित्रावर अंत्यसंस्कार करण्याआधी असा खेळला

हा व्हिडीओ आतापर्यंत 3 लाख 64 हजारहून अधिक लोकांनी पाहिला आहे. दरम्यान हा व्हिडीओ कुठला आहे किंवा या तरुणीचे नाव काय आहे, याबाबत माहिती मिळू शकली नाही आहे.

वाचा-वर्क फ्रॉम होममुळे पती आपल्याकडे लक्ष देईना; पत्नीने शोधून काढली भन्नाट आयडिया

संकलन, संपादन-प्रियांका गावडे.

First published: June 16, 2020, 7:54 AM IST

ताज्या बातम्या