Home /News /viral /

VIDEO : अगदीच अनपेक्षित मृत्यू! बँकेत काचेच्या दरवाजाला धडकली महिला आणि...

VIDEO : अगदीच अनपेक्षित मृत्यू! बँकेत काचेच्या दरवाजाला धडकली महिला आणि...

मृत्यू कधी कुठून येईल आणि कोणाला गाठेल काय माहीत? दाराच्या काचेला धडकून महिलेने बँक कर्मचाऱ्यांच्या डोळ्यादेखत शेवटचा श्वास घेतला. ही घटना CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

    एर्नाकुलम (केरळ), 17 जून : बँकेत कामासाठी गेलेली एक महिला काचेच्या दरवाजाला घाईघाईत धडकून पडली. आपली आपण उठली. सुरुवातीला अगदी एखादी किरकोळ दुखापत झाली असेल असं म्हणून कुणी फार लक्षही दिलं नाही. अगदी तिलाही काही कळायच्या आत भराभर रक्त वाहू लागलं आणि अनपेक्षितपणे अनेक कर्मचाऱ्यांच्या डोळ्यादेखत त्या महिलेने शेवटचा श्वास घेतला. ही घटना केरळच्या एर्नाकुलम जिल्ह्यात पेराम्बवूर इथे एका बँकेत घडली. CCTV फूटेज आता व्हायरल होत आहे. बीना पॉल या चाळीस वर्षांच्या महिलेने या विचित्र अनपेक्षित घटनेत प्राण गमावले. काही कागदपत्र आणण्यासाठी ही महिला बँकेतून घाईघाईत बाहेर पडताना VIDEO मध्ये दिसते. गडबडीत बँकेचा काचेचा दरवाजा लक्षात न आल्याने ती धडकली आणि खाली पडली. किरकोळ दुखापत झाली असेल, असं वाटून ती तिची उठूनही उभी राहिली. बँकेत उपस्थित असणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही या घटनेचं विशेष काही वाटलं नसेल. पण काही क्षणातच त्या महिलेला आपल्याला खूप काही लागलं असल्याची जाणीव झाली असावी. सुरक्षा रक्षक आणि काही कर्माचाऱ्यांनी तिला खुर्चीत बसवलं. पण तरीही दुखापत गंभीर असले अशी कुणकुणही कुणाला लागली नाही. धक्कादायक! रेल्वेसमोर उडी मारण्याआधी मुलीने केला TikTok VIDEO काही क्षणांत ती महिला बसली होती त्या खुर्चीखाली रक्ताचं थारोळं जमा झालं. तेव्हा हे लागणं साधं नाही, गंभीर असल्याची जाणीव झाली. तिला तातडीने जवळच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण उपचारापूर्वीच तिचं निधन झालं. हे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसत आहे. केरळमध्ये एर्नाटकुलममध्ये एक धक्कादायक घटना घडली. घाईघाईने काचेचं दार उघडून बँकेतून बाहेर जाणाऱ्या महिलेला अंदाज न आल्याने ती दरवाजाला धडकून पडली. सुरुवातीला गंभीर न वाटलेल्या या दुखापतीत काचेचा तुकडा वर्मी लागल्याने ती महिला दगावली. अक्षरशः डोळ्यासमोर, काही कळायच्या आत मृत्यू झाला. काचेचा तुकडा या महिलेच्या पोटात गेला असावा. यामुळे अंतर्गत रक्तस्रावही भरपूर झाला आणि तिने सर्वांदेखत बीना पॉल यांनी अखेरचा श्वास घेतला. घाईघाईने काचेचं दार उघडून बँकेतून बाहेर जाणाऱ्या महिलेला अंदाज न आल्याने ती दरवाजाला धडकून पडली. सुरुवातीला गंभीर न वाटलेल्या या दुखापतीत काचेचा तुकडा वर्मी लागल्याने ती महिला दगावली. संकलन - अरुंधती अन्य बातम्या देशात पुन्हा Lockdown लागणार का? पतंप्रधान मोदींनी दिलं हे उत्तर ताडोबातील त्या 3 वाघांच्या मृत्यूचं गूढ उलगडलं, समोर आली धक्कादायक माहिती
    Published by:अरुंधती रानडे जोशी
    First published:

    Tags: Viral video.

    पुढील बातम्या