Home /News /viral /

भूत बंगल्यात जाताच मुलासोबत घडली विचित्र घटना; मृतदेह पाहून डॉक्टरही शॉक

भूत बंगल्यात जाताच मुलासोबत घडली विचित्र घटना; मृतदेह पाहून डॉक्टरही शॉक

1 डिसेंबरला या मुलाने या भीतीदायक घरात आपल्या मित्रासह प्रवेश केला. Daily Star च्या रिपोर्टनुसार, हा मुलगा इमारतीच्या जवळ जाताच त्याची तब्येत खराब होऊ लागली

    नवी दिल्ली 08 डिसेंबर : भूताचं अस्तित्व आणि त्याच्याबद्दलच्या गोष्टी (Ghost Stories) हा केवळ आपल्या मनाचा भ्रम असल्याचं म्हटलं जातं. प्रत्यक्षात भूतही नसतं आणि एखादं ठिकाणंही भूतांचं नसतं. 16 वर्षाच्या एक मुलगाही हेच सगळं मानायचा मात्र जेव्हा तो एका भीतीदायक घरात गेला तेव्हा त्याच्यासोबत भलतंच काहीतरी घडलं. सध्या मलेशियामध्ये ही घटना चांगलीच चर्चेत आहे. हा मुलगा आपला मित्र आणि त्याच्या कुटुंबीयांसोबत प्रसिद्ध ठिकाणी फिरण्यासाठी (Haunted Tourists Attraction) गेला होता. स्थानिक लोकांनी भूताची जागा म्हणून घोषित केलेल्या एका इमारतीत तो आपल्या मित्रासोबत गेला (Haunted Places). मात्र, काहीच वेळात त्याच्यासोबत अजब घटना घडली आणि या इमारतीत घडलेल्या भीतीदायक घटनांमध्ये आणखी एक भर पडली. हेही वाचा - रिकाम्या ऑफिसमध्ये तरुणीचा कारनामा, सोशल मीडियात VIDEO होतोय व्हायरल ही घटना मलेशियाच्या बेनटॉन्गची आहे, जी पेहांग स्टेटमध्ये येते. इथे एक 16 वर्षाचा मुलगा आपल्या मित्रांसोबत आणि त्याच्या कुटुंबीयांसोबत फिरण्यासाठी गेला होता. Kosmo च्या म्हणण्यानुसार, 1 डिसेंबरला या मुलाने या भीतीदायक घरात आपल्या मित्रासह प्रवेश केला. Daily Star च्या रिपोर्टनुसार, हा मुलगा इमारतीच्या जवळ जाताच त्याची तब्येत खराब होऊ लागली. त्याला बरं वाटत नव्हतं आणि हळूहळू तो जमिनीवर कोसळला. त्याचं तोंड आणि शरीर पिवळं पडलं होतं. त्याला लगेचच इमारतीतून बाहेर आणण्यात आलं मात्र तो काहीही प्रतिसाद देत नव्हता. अखेर डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचं घोषित केलं (Boy Died after going in Haunted House), यानंतर त्याच्या कुटुंबीयांना याची माहिती देण्यात आली. हेही वाचा - चिमुकलीला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढण्यासाठी धडपड; बचावाचा थरारक Video viral अधिकृत वक्तव्यात या मुलाचा मृत्यू कार्डिअॅक अरेस्टमुळे झाल्याचं सांगण्यात येत आहे. क्लीवलँड क्लिनिक मेडिकल सेंटरच्या म्हणण्यानुसार, अनेकदा माणूस खूप जास्त घाबरल्यास असं होतं. मात्र, हे सामान्य नाबी. बहुतेक शास्त्रज्ञांचं असं म्हणणं आहे की केवळ भीती वाटल्यामुळे माणसाचा मृत्यू होणं असाधारण आहे. या केसमध्ये या मुलाची इतर कोणतीही मेडिकल हिस्ट्री नव्हती. अशात त्याचा अचानक मृत्यू झाल्याने लोकांच्या मनात या जागेबद्दल आणखीच प्रश्न निर्माण झाले आहेत.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Horror, Shocking news

    पुढील बातम्या