मराठी बातम्या /बातम्या /Viral /

चिमुकलीला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढण्यासाठी धडपड; बचावाचा थरारक Video viral

चिमुकलीला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढण्यासाठी धडपड; बचावाचा थरारक Video viral

चिमुकलीला वाचवण्यासाठी त्यांनी आपल्या जीवाची लावली बाजी.

चिमुकलीला वाचवण्यासाठी त्यांनी आपल्या जीवाची लावली बाजी.

चिमुकलीला वाचवण्यासाठी त्यांनी आपल्या जीवाची लावली बाजी.

  • Published by:  Priya Lad

सँटो डोमिंगो, 07 डिसेंबर :  कधी नाल्यात, कधी बोअरवेलमध्ये लहान मुलं पडल्याच्या बऱ्याच घटना आपण पाहिल्या आहेत (Girl fell in manhole). काही घटनांमध्ये तर या चिमुकल्यांची सुटका करणंही अशक्य होतं आणि त्यांचा जीव जातो. अशाच मृत्यूच्या दारात गेलेल्या एका चिमुकलीला वाचवण्यासाठी लोकांनी धडपड केली (Girl rescue operation video). तिच्या बचावाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral video) होतो आहे.

एक लहान मुलगी गटाराच्या मॅनहोलमध्ये पडली. हा मॅनहोल खूप खोल होता. मुलीला मॅनहोलमध्ये पडताना पाहून एक डिलीव्हरी बॉय आणि एका दुकानाचा मालक तात्काळ तिच्या मदतीसाठी धावून आले. दोघांनीही आपल्या जीवाचा विचार केला नाही. एकाने मॅनहोलमध्ये उडी मारली. त्या दोघांना पाहताच आणखी काही लोक मदतीसाठी धावून आले आणि मग सुरू झाला चिमुकलीच्या बचावाचा थरार.

GoodNewsCorrespondent ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.  व्हिडीओत पाहू शकता एका मॅनहोलभोवती बरेच लोक आहेत. याच मॅनहोलमध्ये ही चिमुकली पडली आहे. तिला बाहेर काढण्यासाठी अतोनात प्रयत्न सुरू आहेत.

हे वाचा - छोट्याशा पक्ष्यासमोर भलामोठा बिबट्याही फेल; कधीच पाहिला नसेल असा शिकारीचा VIDEO

काही वेळातच मॅनहोलच्या बाहेर असलेला तरुण मुलीच्या खांद्याला धरून तिला वर काढताना दिसतो. त्यानंतर दुसरी व्यक्ती तिला उचलून घेते. या मुलीच्या शरीराला घाण लागलेली आहे. तिसरी व्यक्ती तिच्या डोक्यावर पाणी ओतून तिला स्वच्छ करताना दिसते. त्यानंतर मॅनहोलमधून आणखी एक तरुण बाहेर पडताना दिसतो. हा तोच तरुण आहे जो या चिमुकलीला वाचवण्यासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता या मॅनहोलमध्ये उतरला.

हे वाचा - दिमाखात स्टंट करायला गेला अन्...; डोक्यावर पडून तरुणाची झाली अशी अवस्था, VIDEO

पोस्टनुसार ही माहिती डोमिनिकन रिपब्लिकनमधील आहे. भारतातही अशी बरीच प्रकरणं समोर येत असतात. काही प्रकरणांमध्ये तर मॅनहोलमध्ये पडलेल्या मुलांचा मृत्यूही होतो. पण या मुलीचं नशीब बलवत्तर म्हणून तिच्यासाठी हे सर्व लोक देवदूत बनून धावून आले आणि तिला वाचवलं. या मुलीला वाचवणाऱ्या सर्वांचं कौतुक केलं जातं आहे.

First published:

Tags: Rescue operation, Viral, Viral videos