सिऊल, 7 डिसेंबर: एक तरुणी रिकाम्या कार्यालयात डान्स करत असतानाचा (Girl dancing video) व्हिडिओ सध्या सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत आहे. अनेक लोक अंतर्मुख (Introvert people) स्वभावाचे असतात. आपल्या आजूबाजूला इतर लोक असताना त्यांना आपल्या अंगातील कलाकृती दाखवायला (artist persons) आवडत नाहीत. इतरांसमोर शांत आणि गंभीर राहणाऱ्या या व्यक्ती मात्र एकांतात खुलताना दिसतात. काही व्यक्ती या त्यांना ऑडियन्स मिळाला तर खुलतात, तर याविरुद्ध काही व्यक्ती मात्र एकांताचा आनंद घेताना दिसतात. एकांतात आपल्या नृत्यकौशल्याचा स्वतःच आनंद घेणाऱ्या एका तरुणीचा व्हिडिओ सध्या सोशल (Video goes viral) मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
itzy saw this viral video @ITZYofficial pic.twitter.com/QJ9tLHTZdC
— (@lov4itzy) December 6, 2021
तरुणीने केला डान्स
व्हायरल होणाऱ्या व्हिडिओत एक तरुणी रिकाम्या ऑफिसमध्ये साफसफाई करताना दिसते. ऑफिसमध्ये एकही व्यक्ती हजर नाही. ऑफिस सुरू होण्यापूर्वी साफसफाई करण्याचं काम या तरुणीकडे आहे. आपलं काम करण्यासाठी ही तरुणी सज्ज होते आणि संगीताचा आनंद घेत आपलं काम करू लागते.
साफसफाई करताना स्टेप्स
एखादी व्यक्ती कुठल्याही कामात कसा आनंद शोधू शकते, हे या तरुणीकडे पाहून लक्षात येतं. साफसफाईच्या कामात कसला आलाय आनंद, असा प्रश्न अनेकांना पडू शकतो. मात्र काम कुठलंही असो, ते जर मनापासून केलं, तर त्याचा मनमुराद आनंद लुटता येऊ शकतो, हे या तरुणीकडे पाहिल्यावर सिद्ध होतं. तरुणी सोफा साफ करताना, एका टेबलाकडून दुसऱ्या टेबलाकडे जाताना आणि अगदी झाडू मारतानादेखील ठेका धरते. आपली कंबर आणि खांदे हलवत ती ज्या सराईतपणे डान्स करते, ते पाहून ती जणू एखादी प्रोफेशनल डान्सर असावी, असाच भास पाहणाऱ्यांना होतो.
हे वाचा- या मांजरीला मिळालं साडेचार लाखांचं गिफ्ट, पार्लरमध्ये जाऊन करते ऐश
व्हिडिओ होतोय व्हायरल
सीसीटीव्हीत कैद झालेला हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला आहे. आतापर्यंत अनेकांनी हा व्हिडिओ लाईक केला असून त्यावर कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Dance video, Video viral