बैरुत, 5 ऑगस्ट : लेबननची (Lebanon) राजधानी बैरुतमध्ये (Beirut blasts) मंगळवारी सायंकाळी एक मोठा स्फोट झाला. हा स्फोटाची भीषणता इतकी होती की, तब्बल 10 मैलपर्यंतचा परिसर हादरला. या स्फोटाची भीषणता दाखवणारे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले आहेत. असाच एक वेडिंग फोटोशूटचा व्हिडीओ सध्या व्हायरल होतो आहे. एक नवरी नटून-थटून वेडिंग फोटोशूट करत होती. नवरीने पांढऱ्या रंगाचा वेडिंग गाऊन घातला आहे. फोटोसाठी चेहऱ्यावर स्मितहास्य देत पोझ देऊन उभी होती. इतक्यात मोठा स्फोट होतो आणि एका क्षणात सर्वकाही उद्धवस्त होतं. नवरा-नवरी आणि शूटिंग करणारे सर्व जण आपला जीव मुठीत धरून पळताना दिसत आहेत.
बैरूतमध्ये स्फोट झाल्यानंतर अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. काही व्हिडीओमध्ये हा अणुबॉम्ब हल्ला असल्याचे सांगितले होते. मात्र आता समोर आलेल्या माहितीनुसार हा अणुबॉम्ब हल्ला नसून अमोनियम नायट्रेटचा (ammonium nitrate ) स्फोट झाल्याचे समोर आले आहे. हे वाचा - Beirut Blast: बैरूतमध्ये झाला अणुबॉम्ब हल्ला? वाचा काय आहे या VIDEO मागचं सत्य अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की एका गोदामात एक प्रचंड मोठ्या प्रमाणात स्फोटक मटेरियल स्टोअर होते आणि तेथे स्फोट झाला.
What looks like fireworks going off before the large explosion at the #Beirut port. #Lebanon pic.twitter.com/D3PlidjjNA
— Joe Truzman (@JoeTruzman) August 4, 2020
लेबननच्या गृहमंत्र्यांनी घटनेविषयी स्थानिक माध्यमांना सांगितले की, बंदरावर मोठ्या प्रमाणात अमोनियम नायट्रेट आहे. लेबनीज कस्टमची याप्रकरणी चौकशी केली जाणार आहे की बंदरात इतक्या मोठ्या प्रमाणात अमोनियम नायट्रेट काय करीत आहे? दुसरीकडे, लेबनीजचे प्रसारक मायडेन यांनी कस्टम संचालकांच्या हवाल्याने असे म्हटले आहे की सुमारे एक टन नायट्रेटचा स्फोट झाला असावा. राष्ट्रपती मायकेल इऑन यांनी ट्विट केले आहे की 2,750 टन स्फोटक नायट्रेट असुरक्षित पद्धतीने साठवले गेले होते. हा स्फोट कसा झाला याचा तपास सुरू आहे. हे वाचा - सोशल मीडियावर VIRAL झालेल्या बैरूतच्या स्फोटाचं कारण उघड; शहराची काय स्थिती झाली लेबननच्या आरोग्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या स्फोटात आतापर्यंत 70 पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 4000 लोकं जखमी झाले आहेत. लेबननचे पंतप्रधान हसन डायब यांनी बुधवारी राष्ट्रीय शोक दिन जाहीर केला आहे.