धक्कादायक VIDEO! खेळता खेळता पाचव्या मजल्यावरून घसरली 5 वर्षांची चिमुरडी, खाली पडणार तेवढ्यात...

धक्कादायक VIDEO! खेळता खेळता पाचव्या मजल्यावरून घसरली 5 वर्षांची चिमुरडी, खाली पडणार तेवढ्यात...

खेळत असताना अचानक 5 वर्षांच्या चिमुरडीचा घसरला पाय, पण खाली न पडता बाल्कनीतच अडकली. या घटनेचा मन हादरवणारा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

  • Share this:

बीजिंग, 05 ऑगस्ट : चीनच्या (China) हुबेई प्रांताच्या (Hubei province) झोयांग शहरात (Zaoyang City) एक धक्कादायक प्रकार घडला. येथील एका इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून खेळत असताना मुलगी खाली पडली, सुदैवाने ही मुलगी बाल्कनीच्या लोखंडी जाळ्यात अडकली. डोकं जाळ्यात अडकल्यामुळे ही मुलगी तब्बल 50 फूट उंच इमारतीत लटकू लागली. या चिमुरडीची मान विचित्र प्रकारे अडकली होती, त्यामुळे मुलीला बाहेर काढणे कोणालाच जमत नव्हते. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

डेली मेलच्या वृत्तानुसार, या मुलीचे वय 5 वर्ष असल्याचे सांगितले जात आहे. तिच्या आई-वडिलांनीच तिला बाल्कनीमध्ये खेळण्यास सांगितले होते. जाळीमध्ये अंतर असल्याने ही चिमुरडी पाय घसरून खाली पडली. मात्र ग्रीलमध्ये तिची मान अडकली. प्रत्यक्षदर्शीने सांगितले की मुलीच्या रडण्याचा आवाज ऐकून लोकं इमारतीच्या खाली जमा झाले. सुरवातीला शेजारी आणि आई-वडिलांनी तिला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, मात्र ते अयशस्वी ठरले. अखेर अग्निशमन दलाने ग्रील कापून मुलीला बाहेर काढले.

वाचा-समुद्र किनाऱ्यावर सापडला 15 फूटी लांब मृतदेह, रहस्यमय PHOTO पाहून लोक हादरले

वाचा-तिखट मोमोज खाल्ल्यामुळे पोटात झाला स्फोट, रुग्णांची अवस्था पाहून डॉक्टरही हादरले

या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये मुलीची मान ग्रीलमध्ये अडकल्याचे दिसत आहे. गळ्याच्या सहाय्याने लोखंडी जाळीतून लटकलेली दिसत आहे. असं म्हणतात की मुलाच्या पालकांनी तिला खेळायला सोडलं आणि तो शेजारच्या ठिकाणी गेला. शेजार्यांेनी सांगितले तेव्हा त्यांना हे कळले, तेव्हा ते लगेचच मदतीसाठी गेले.

वाचा-VIDEO: ...आणि एका क्षणात झाले ट्रॅक्टरचे दोन तुकडे, बाइक चालकाचा मृत्यू

मात्र मुलीची मान बाहेर काढण्यात त्यांना यश आले नाही. अखेर अग्निशमन दलाला त्यांनी बोलवले. त्यानंतर ग्रील कापून मुलीला वाचवण्यात यश आले.

Published by: Priyanka Gawde
First published: August 5, 2020, 3:01 PM IST

ताज्या बातम्या