जाहिरात
मराठी बातम्या / Viral / घोडेस्वारीची हौस पडली भलतीच महागात, वेगात खांबाला जाऊन धडकला आणि...; पाहा VIDEO

घोडेस्वारीची हौस पडली भलतीच महागात, वेगात खांबाला जाऊन धडकला आणि...; पाहा VIDEO

घोडेस्वारीची हौस पडली भलतीच महागात, वेगात खांबाला जाऊन धडकला आणि...; पाहा VIDEO

सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणार एक व्हिडिओ (Video) पाहून तुम्हीदेखील घोडेस्वारी करण्याआधी विचार कराल. सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं, की एक घोडेस्वार जोरात आपल्या घोड्याला पळवत असतो

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली 12 जून : जगभरातील प्रत्येक व्यक्तीला काहीतरी आवड किंवा हौस असते. मात्र, काही गोष्टी अशा असतात, ज्या सर्वांनाच कराव्या वाटतात. यातीलच एक उदाहरण म्हणजे घोडेस्वारी (Horse Riding). संधी मिळताच प्रत्येक व्यक्ती घोडेस्वारीची आपली हौस पूर्ण करून घेतो. मात्र, घोडेस्वारी हा लहान मुलांचा खेळ नाही, हेदेखील तितकंच खरं. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणार एक व्हिडिओ (Video) पाहून तुम्हीदेखील घोडेस्वारी करण्याआधी विचार कराल. सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं, की एक घोडेस्वार जोरात आपल्या घोड्याला पळवत असतो. त्याच्या बाजूनं दुचाकीवरही काही लोक चाललेले दिसतात. हा मुलगा घोड्याला पळवण्यात इतका रमून जातो की समोर आलेला खांबही त्याला दिसत नाही. याचा खांबाला घोडा धडकतो आणि घोड्यावर बसलेला मुलगा जोरात खाली पडतो. पतीची हत्या करत महिलेचं विकृत कृत्य, गुप्तांग कापून तेलात तळलं आणि मग…

या घटनेचं पुढचं फुटेज समोर न आल्यानं घोड्याला आणि या मुलाला दुखापत झाली का, याबाबतची माहिती मिळालेली नाही. ही संपूर्ण घटना जवळच उभा असलेल्या एका व्यक्तीनं कॅमेऱ्यात कैद केली. आता सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. यानंतर काहींनी हलगर्जीपणासाठी या मुलाला सुनावलं आहे. तर, काहींनी कमेंट करत या मुलाबाबत आणि घोड्याबाबत चिंता व्यक्त केली आहे. हा व्हिडिओ 4 जून रोजी राणा अमरप्रतापनं शेअर केला आहे. तेव्हापासून हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. बातमी देईपर्यंत हा व्हिडिओ तीन लाखहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. तर, जवळपास ९० हजार लोकांनी व्हिडिओ लाईक केला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात