नवी दिल्ली 12 जून : पती आणि पत्नीमध्ये होणारे वाद ही अगदी सगळ्याच घरांमधील गोष्ट आहे. मात्र, अनेकदा भांडण इतकं वाढतं की ते थेट घटस्फोटापर्यंत (Divorce) जातं. अनेक प्रकरणं अशीही पाहायला मिळतात की या भांडणातून हत्याही झाली आहे. मात्र, आता समोर आलेलं एक प्रकरण ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. या घटनेमध्ये महिलेनं आपल्या पतीची हत्या (Wife Kills Husband) केली आहे. इतकंच नाही तर यानंतर तिनं आपल्या पतीचा प्रायव्हेट पार्ट (Private Part) कापून तेलात टाकत तळला असल्याचा आरोप तिच्यावर आहे. जमिनीसाठी इमानाशी बेईमानी, कोट्यवधी रुपये लाटणाऱ्या 2 सरकारी अधिकाऱ्यासह एका अटक ही घटना ब्राझीलमधून असून क्रिस्टिना रोड्रिगेज मशाडो असं या 33 वर्षीय महिलेचं नाव आहे. सध्या ही महिला पोलिसांच्या ताब्यात असून चौकशीत काही थक्क करणारे खुलासे झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, क्रिस्टिना साओ गोनकालोमध्ये आपल्या पतीसोबत राहात होती. दोघांमध्ये सतत वाद होत असत. पोलिसांनी जेव्हा या घटनेची माहिती मिळाली तेव्हा ते घटनास्थळी दाखल झाले, मात्र याठिकाणी त्यांना धक्कादायक चित्र पाहायला मिळालं. पोलिसांचं असं म्हणणं आहे, की आंद्रेचा प्रायव्हेट पार्ट पॅनमध्ये सोयाबीन तेलात तळण्यात आला होता. पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास, पण सेल्फी पाहताच चढला पारा, ओढत नेले पोलिसांकडे काही रिपोर्टनुसार, आंद्रे आणि क्रिस्टिना यांच्यात घटस्फोटावरुन वाद सुरू होते. दोघंही दहा वर्षांपासून सोबत राहात होते. या काळात मध्येच दोन वर्ष ते विभक्त झाले होते. मात्र, पुन्हा एकत्र राहू लागले. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, त्यांना दोन मुलंही आहेत. मात्र, दोघांमध्ये सतत वाद होत असत. क्रिस्टिनाच्या वकिलांचं असं म्हणणं आहे, की आंद्रेला हे नातं संपवायचं नव्हतं. आंद्रेवर असा आरोप करण्यात आला, की त्यानं क्रिस्टिनाला म्हटलं, तू माझ्यासोबत न राहिल्यास कोणाचसोबत राहू शकणार नाहीस. वकिलांचा दावा आहे, की आंद्रे वारंवार तिला जीवे मारण्याची धमकी द्यायचा. या प्रकरणात इतरही अनेक बाबी समोर आल्या आहेत. मात्र, सध्या पोलीस याचा तपास करत आहेत. मात्र, हे प्रकरण सध्या चर्चेचा विषय ठरलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.