नवी दिल्ली 08 ऑगस्ट : अमेरिकेचे (America) माजी परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पिओ (Mike Pompeo) यांना भेट (Gift) म्हणून देण्यात आलेली US $ 5,800 ची जपानी व्हिस्की (Japanese Whiskey) अचानक गायब झाली आहे. या घटनेनंतर अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयात गोंधळ उडाला आहे आहे आणि या महागड्या दारूचं काय झालं? हे शोधण्यासाठी तपास सुरू केला गेला आहे. जपान सरकारनं पोम्पिओ यांना 2019 मध्ये 5800 अमेरिकी डॉलर म्हणजे 4,32,085 रुपयांची व्हिस्कीची भेट म्हणून दिली होती.
आता ही व्हिस्की कुठे गेली, याचा काही माहिती मिळत नाहीये. यानंतर विभागानं आता याविरोधात पाऊल उचलत व्हिस्कीचा तपास सुरू केला आहे. मागच्या दोन दशकात अशाप्रकारचा तपास पहिल्यांदाच झाल्याचं पाहायला मिळतं. पॉम्पिओ यांनी स्वतः ही व्हिस्की घेतली होती की कोणत्या कर्मचाऱ्यानं ती स्वीकार केलेली याबाबत अद्याप माहिती नाही. कारण पॉम्पिओ म्हणाले, की त्यांना व्हिस्कीची बॉटल गिफ्ट म्हणून मिळालेली नाही आणि ही गायब झालीये याबाबतही त्यांना काहीही माहिती नाही.
जब तक है जान! पुराच्या पाण्यात बुडाली निम्मी गाडी तरी...; पाहा मजेशीर VIDEO
एका अमेरिकी न्यूज चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत माजी परराष्ट्र मंत्री म्हणाले, की मला असं वाटतंय की त्याला कधी हातही लावला गेला नव्हता. ती माझ्यापर्यंत कधी पोहोचलीच नाही. परराष्ट्र मंत्रालयाकडून ती गायब कशी झाली, याबाबतही मला काहीही माहिती नाही. पॉम्पिओ यांचे वकील विलियम बुर्क म्हणाले, की माजी परराष्ट्र मंत्र्यांना व्हिस्कीची बॉटल गिफ्ट म्हणून मिळाल्याचं आठवत नाही. तसंच या बॉटलचं काय झालं, याबाबतही त्यांना काहीही माहिती नाही.
महापौर कार्यालयात भूत? गार्डवर हल्ला; महापौरांनी शेअर केला Horror video
अमेरिकी अधिकारी 390 डॉलरपेक्षा कमी किमतीच्याच भेटवस्तू घेऊ शकतात. मात्र, त्यापेक्षा महागाच्या वस्तू गिफ्ट म्हणून त्यांना घ्यायच्या असतील तर त्या त्यांना खरेदी कराव्या लागतात. व्हिस्कीची बेपत्ता बॉटल तब्बल 5,800 अमेरिकी डॉलरची होती. अशात या बॉटलचं नेमकं काय झालं, याचा शोध सुरू आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.