नवी दिल्ली 30 ऑक्टोबर : अनेकदा आपल्याला आपल्याच घरात अशा वस्तू सापडतात, ज्याचा विचारही केलेला नसतो. ब्रिटनमधील एका वृद्ध महिलेसोबतही असंच झालं. महिला आपल्या घराची साफसफाई करत होती. इतक्यात तिची नजर एक चमकणाऱ्या दगडावर गेली. महिला हा दगड कचऱ्यात फेकणारच होती, मात्र इतक्यात तिचा विचार बदलला. जेव्हा ती हा दगड ऑक्शनरकडे घेऊन गेली तेव्हा याची किंमत ऐकून तिला धक्काच बसला (20 Crore Rupees Worth Diamond).
सुट्टी मिळवण्यासाठी कर्मचाऱ्यानं शोधलं अजब कारण; ऐकताच भडकला बॉस
महिलेला या गोष्टीचा अजिबातही अंदाज नव्हता की तिला जो दगड आढळला आहे, तो 34 कॅरेटचा मौल्यवान हिरा आहे (Woman Found Rare Diamond in House). घरामधील इतर कचऱ्यासोबतच महिलेनं तो फेकला असता तर तिला तब्बल २० कोटी रुपयांना मुकावं लागलं असतं. मात्र, महिलेचं नशीब चांगलं होतं की हा दगड फेकण्याऐवजी तिने ऑक्शनरकडे नेला.
डेली मेलच्या वृत्तानुसार, ही महिला ऩॉर्थंबरलंडमध्ये राहते आणि तिचं वय 70 वर्ष आहे. महिलेचं असं म्हणणं आहे, की तिला जितकं आठवतं त्यानुसार तिनं हा हिरा कार बूथ सेलमधून ज्वेलरीसोबतच खरेदी केला होता. मात्र, तिला याची अजिबातही कल्पना नव्हती की हा हिरा इतका महाग आहे. लग्नातील ज्वेलरीसोबतच हा हिरादेखील घरातील कोपऱ्यात पडलेला होता. सफाई करताना महिलेला हा हिरा आढळताच ती तो ऑक्शनरकडे घेऊन गेली. ऑक्शनरनं सांगितलं, की महिला बॅगमध्ये या हिऱ्यासोबतच इतर ज्वेलरीदेखील घेऊन आली होती. तिला हे ज्वेलरी विकायची होती. हिरा वगळता इतर दागिन्यांची किंमत अतिशय कमी होती.
'हम दिल दे चुके सनम'! पतीनं प्रियकरासोबत लावलं पत्नीचं लग्न, वाचा लव्ह स्टोरी
हिऱ्याची तपासणी केली असता समजलं की हा क्यूबिक जिरकोनिया आहे, जो दिसताना सिंथेटिक डायमंडप्रमाणे दिसतो. ऑक्शनरनं सांगितलं, की टेस्टिंगच्या आधी त्यांनादेखील हा हिरा सामान्यच वाटला होता. मात्र, टेस्टनंतर समजलं की हा हिरा 34 कॅरेटहून अधिक आहे. हा अतिशय़ दुर्मिळ हिरा होता. हा हिरा महिलेपर्यंत कसा पोहोचला हे कोणालाच समजलं नाही. महिलेची ओळख गुप्त ठेवली गेली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Diamond, Viral news