Home /News /viral /

पिझ्झा खाताच मुलाच्या तोंडातून येऊ लागलं रक्त अन् मग...; धक्कादायक कारण समोर आल्यानं खळबळ

पिझ्झा खाताच मुलाच्या तोंडातून येऊ लागलं रक्त अन् मग...; धक्कादायक कारण समोर आल्यानं खळबळ

pizza (Representative Image)

pizza (Representative Image)

जेस पामर नावाच्या महिलेनं रविवारी संध्याकाळी जेवणाच्या आधी आपला मुलगा स्टेनली याच्यासाठी पिझ्झा (Pizza) मागवला होता. पिझ्झा खात असताना या मुलाच्या तोंडातून अचानक रक्त येऊ लागलं.

    नवी दिल्ली 02 ऑगस्ट : पिझ्झा (Pizza) हे नाव जरी ऐकलं तरी अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं. ऑफिस असो घर असो किंवा आणखी कोणतं ठिकाणं, लहान-लहान गोष्टींचा आनंद साजरा करण्यासाठी अनेकजण पिझ्झा पार्टी (Pizza Party) करतात. बहुतेक लोकांना पिझ्झा खायला भरपूर आवडतं. मात्र, पिझ्झा खात असताना एका मुलासोबत जे घडलं, ते जाणून घेतल्यानंतर पिझ्झा खाण्याआधी तुम्ही नक्कीच विचार कराल. या घटनेत पिझ्झा खाल्ल्यानंतर एका 8 वर्षीय मुलाच्या तोंडातून रक्त (Blood) येऊ लागलं. कारण या पिझ्झामध्येच काचेच तुकडा होता, ज्यामुळे या मुलाच्या तोंडात जखम झाली. अफगाणिस्तानकडून तालिबानची ठिकाणे उद्धवस्त; पाहा एअरस्ट्राइकचा VIDEO मिळालेल्या माहितीनुसार, आठ वर्षाच्या या मुलाचा ओठ कापला गेला. या घटनेनंतर मुलाची आईदेखील हैराण झाली. जेस पामर नावाच्या महिलेनं रविवारी संध्याकाळी जेवणाच्या आधी आपला मुलगा स्टेनली याच्यासाठी पिझ्झा मागवला होता. पिझ्झा खात असताना या मुलाच्या तोंडात काहीतरी टोचल्याचं त्यानं सांगितलं. यानंतर या मुलाच्या तोंडातून काच किंवा प्लास्टिकचा एक टोकदार तुकडा निघाला. मुलाच्या आईनं सांगितलं, की हा तुकडा काचेचा होता, की प्लास्टिकचा याबाबत मी खात्रीनं सांगू शकत नाही, मात्र, माझ्या मुलाच्या जबड्यातून मोठ्या प्रमाणात रक्त येत होतं. हा तुकडा मला काचेप्रमाणे वाटला. मुलाच्या आईनं सांगितलं, की पिझ्झा कंपनी (Pizza Company) असदा यांच्या वागणुकीमुळे त्या नाराज आहेत आणि पिझ्झा कंपनीनं त्यांना असं सांगितलं आहे, की ते याचा तपास करू शकत नाहीत, कारण याचं पॅकेजिंग त्यांनी केलेलं नव्हतं. महिलेनं म्हटलं, की ज्याला कोणाला या पिझ्झाचा भाग मिळाला आहे, त्यानं आतापर्यंत तो खाल्लाही असेल आणि ही अतिशय गंभीर बाब आहे. पिझ्झा कंपनी असदानं यासाठी माफी मागितली आहे. लग्नात नवरीची धमाकेदार एन्ट्री; VIDEO पाहून तुम्हीही म्हणाल 'क्या बात है' मुलाच्या आईचं असं म्हणणं आहे, की त्यांनी याआधीही अनेकदा असदाचा पिझ्झा विकत घेतला आहे, कारण त्यांच्या मुलाला तो आवडतो. जेसनं म्हटलं, की पिझ्झा खायला सुरुवात करताच तिच्या मुलाच्या ओठांमधून मोठ्या प्रमाणात रक्त येऊ लागलं, हे पाहून ती हैराण झाली. ही घटना समोर आल्यानंतर लोक घाबरले आहेत. यावर कमेंट करत काही यूजरनं म्हटलं, की विकत घेतलेली कोणतीही वस्तू तुम्ही आधी तपासून मगच वापरायला हवी. ती कितीही चांगल्या कंपनीची असली तरीही.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Pizza, Viral news

    पुढील बातम्या