जाहिरात
मराठी बातम्या / Viral / लग्नात नवरीची धमाकेदार एन्ट्री; VIDEO पाहून तुम्हीही म्हणाल 'क्या बात है'

लग्नात नवरीची धमाकेदार एन्ट्री; VIDEO पाहून तुम्हीही म्हणाल 'क्या बात है'

लग्नात नवरीची धमाकेदार एन्ट्री; VIDEO पाहून तुम्हीही म्हणाल 'क्या बात है'

या व्हायरल व्हिडिओमध्ये बाईकवर दोन मुली बसलेल्या दिसत (Bike Ride) आहेत. दोघींनीही लेहंगा आणि भरपूर दागिने घातलेले आहेत. दोन्ही मैत्रिणी या सवारीची मजा घेताना दिसत आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली 02 ऑगस्ट : लग्नात नवरीच्या एन्ट्रीच्या (Bride Entry) बाबतीत पूर्वीपेक्षा बरेच बदल झाले आहेत. आता नवरी लाजत मान खाली घालून नाही तर कधी डान्स करत आणि कधी बाईकवर बसून मंडपात प्रवेश करताना दिसते. इतकंच नाही तर अनेकदा नवरीबाई आपल्या मैत्रिणींसोबत नाचत-गात मंडपात एन्ट्री करतात. काही स्वतः चारचाकी घेऊन मंडपात पोहोचतात तर काही बाईक घेऊन. सध्या अशाच एका नवरीच्या एन्ट्रीचा व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत आहे. ओ शेठ तुम्ही नादच केलाय थेट! 18 सेकंदात फस्त केला तब्बल 2 लीटर सोडा; पाहा VIDEO तुम्ही जर असा विचार करत असाल की मुलींना केवळ बाईकच्या मागील सीटवर बसून फिरण्यासच आवडतं, तर तुम्ही चुकीचे आहात. आपल्या आसपास अनेक अशा मुली असतात ज्यांना स्वतःला बाईक चालवणं आवडतं. नुकताच Witty Wedding नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर केला गेला आहे. यात एक तरुणी बाईक चालवताना दिसते, तर मागे बसलेली आणखी एक मुलगी या सवारीचा आनंद घेताना दिसते.

जाहिरात

VIDEO: एक विवाह ऐसा भी! या जोडप्याचं लग्न पाहण्यासाठी झालं ‘ट्रॅफिक जॅम’ या व्हायरल व्हिडिओमध्ये बाईकवर दोन मुली बसलेल्या दिसत (Bike Ride) आहेत. दोघींनीही लेहंगा आणि भरपूर दागिने घातलेले आहेत. दोन्ही मैत्रिणी या सवारीची मजा घेताना दिसत आहेत. या पेजवरुन लग्नातील व्हिडिओच (Wedding Video) शेअर केले जातात, तसंच या दोघींचा लूक पाहता दोन्ही मैत्रिणीही लग्नासाठीच निघाल्या असल्याचा अंदाज आहे. सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेला हा व्हिडिओ आतापर्यंत 17 हजारहून अधिकांनी पाहिला आहे. या व्हिडिओवर अनेक महिला यूजर्सच्या कमेंट आल्या आहेत. या कमेंट पाहता त्यांनाही आपल्या लग्नात अशीच एन्ट्री करायची असल्याचं जाणवत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात