मुंबई, 27 सप्टेंबर : सिंह (Lion video) ज्याला जंगलाचा राजा म्हटलं जातं. आपल्या आवाजानं तो जंगल हादरवून टाकतो. भलेभले प्राणी त्याच्यासमोर टिकत नाही (Lion attacking on animal video) . पण या अशा सिंहांना साध्या म्हशीसुद्धा (Lion attacking on buffalo) चांगल्याच भारी पडल्या आहेत. म्हशींच्या कळपासमोर सिंहांच्या कळपांना हार मानावी लागली (Buffalo attacking on lion). इतर वेळी म्हैस सिंहाला पाहून घाबरते आणि पळ काढते (Lion buffalo fighting video). मात्र म्हशीच्या कळपानं सिंहांच्या कळपाला (Animal video) पळवून लावल्याचा हा दुर्मिळ व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) तुफान व्हायरल (Viral video) झाला आहे.
आपल्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी माणसं ज्याप्रमाणे धडपडत असतात, त्याप्रमाणे प्राणीदेखील आपल्या जीवाची बाजी लावतात. जंगलात राहताना प्राण्यांना मोठा संघर्ष करावा लागतो. अनेक प्राण्यांना हिंस्त्र प्राण्यांपासून आपलं आणि आपल्या कुटुंबाचंही रक्षण करण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागतो. असाच हा व्हिडीओ आहे. ज्यात एक म्हशीवर सिंहाच्या कळपाने हल्ला केला, त्यानंतर म्हशींचा कळपही त्या म्हशीला सिंहापासून वाचवण्यासाठी धावत आला.
Consider yourself rich if you have friends who are always there for you. A lesson from the wild. Credits in the video. pic.twitter.com/TYJxBrTdKr
— Sudha Ramen IFS 🇮🇳 (@SudhaRamenIFS) September 27, 2021
व्हिडीओत पाहू शकता एका म्हशीला सिंहांच्या कळपाने घेरलं आहे. सिंहांनी म्हशीवर हल्ला केला आहे. कुणी तिचा पाय धरला आहे तर कुणी तिच्या पाठीवर बसून जबड्याने तिचे लचके तोडण्याचा प्रयत्न करत आहे. आता या म्हशीचं काही खरं नाही. ती काही सिंहाच्या तावडीतून सुटत नाही असंच आपल्याला वाटतं. पण थांबा ही तर फक्त सुरुवात आहे. खरा पिक्चर अजून बाकी आहे.
हे वाचा - सिंहाच्या कळपात एकटी भिडली आई; सिंहिणीच्या जबड्यातूनही म्हशीने वासराला खेचून आणलं
आता पुढे एंट्री होते ती दुसऱ्या म्हशीची. आपल्या साथीदारावर कुणीतरी हल्ला केल्याचं समजताच दुसरी म्हैस दूरहून वेगाने धावत येते. समोर कोणता प्राणी आहे हेसुद्धा ती पाहत नाही. धावत येते तेच पहिल्या म्हशीच्या अंगावर चढलेल्या तीन-चार सिंहांना ती शिंगावर धरून उडवून देते. त्यानंतर भीतीने इतर सिंह स्वतःच बाजूला होतात. नंतर मागून म्हशींचा कळप धावत येतो. त्यातील तिसरी म्हैसही सिंहांचा पाठलाग करते. यानंतर सर्व सिंह म्हशींना पाहून तिथून धूम ठोकतात.
हे वाचा - VIDEO: आपल्या साथीदारांना वाचवण्यासाठी थेट सिंहाशी भिडली म्हैस; पुढे असं काही झालं...
एकीचं बळ काय असतं हे या म्हशींनी दाखवून दिलं आहे. म्हशींनी सर्व सिंहांना सरो की पळो करून सोडलं. एका क्षणात त्यांनी बाजी पलटवली. आयपीएस अधिकारी सुधा रमण यांनी हा व्हिडीओ आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. यावर बऱ्याच कमेंट येत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Viral, Viral videos, Wild animal