कॅनबेरा, 27 सप्टेंबर : बहुतेक लहान मुलींना बार्बी डॉल (Barbie Doll) आवडते. त्यांना आपल्या बार्बी डॉलसारखं दिसायलाही आवडतं. मग बार्बी डॉलसारखा ड्रेस हवा, तिच्यासारखी हेअरस्टाइल हवी असते, बार्बी डॉलसारखा मेकअप हवा असतो. पण फक्त लहान मुलीच नाही तर अगदी तरुणांनाही आपण बार्बी डॉलसारखं दिसावं असं वाटतं. पण लहान मुलींप्रमाणे त्यांचं ड्रेस, हेअरस्टाइल, मेकअपवर भागत नाही तर त्या बार्बी डॉलसारखे ओठ, डोळे हवेत म्हणून स्वतःची कॉस्मेटिक किंवा प्लॅस्टिक सर्जरीही (Plastic Surgery) करून घेतात. एका महिलेने तर हद्दच केली, ती याच्याही पुढे गेली. तिला फक्त आपले डोळे, ओठ नव्हे तर चक्क आपला प्रायव्हेट पार्टही बार्बी डॉलसारखा हवा होता (Barbie Doll Private Part). पण तिची ही हौस तिला चांगलीच महागात पडली.ऑस्ट्रेलियातील लेखिका आणि पत्रकार असलेली केसी बेरोस (Casey Beros) आपल्या व्हजायनाच्या (Vagina) बाह्यरचनेमुळे खूश नव्हती. तिला बार्बी डॉलसारखी व्हजायना हवी होती (Barbie Doll Vagina). वयाच्या विशीत तिने डिझाइनर व्हजाइनाशी संबंधित एक डॉक्युमेंट्री पाहिली, ज्यामध्ये सर्जरीच्या माध्यमातून प्रायव्हेट पार्टमध्ये बदल करण्याबाबत माहिती देण्यात आली होती.
हे वाचा - ऐकावे ते नवल! बार्बी डॉलसारखं दिसण्यासाठी खर्च केले 72 लाख रुपये
डेली स्टारच्या रिपोर्टनुसार मीडियाशी बोलताना केसीने सांगितलं, तिला खूप कमी वयापासूनच गुप्तांगाच्या बनावटीत बदल करावा असं वाटत होतं. जेणेकरून तिच्यातील आत्मविश्वास वाढेल, न्यूनगंडता आणि लाज वाटणार नाही. शेवटी तिने लेबियाप्लास्टी (labiaplasty) म्हणजे गुप्तांगाची प्लॅस्टिक सर्जरी करण्याता निर्णय घेतला. तिने सर्जरी केलीसुद्धा पण त्यानंतर तिला पश्चाताप झाला.
तिने सांगितलं, सर्जरीआधी तिने अडल्ट व्हिडीओ पाहिले नव्हते, ज्यामुळे इतर महिलांचे गुप्तांगही तिच्यासारखे असतात हे तिला समजलं. तिला फक्त एका बाहुलीच्या प्रायव्हेट पार्टप्रमाणे आपला प्रायव्हेट हवा होता. सर्जरीनंतर तिचं गुप्तांग खूप लहान झालं आणि त्यातील संवेदनशीलताही संपली.
हे वाचा - बार्बी डॉलसारखं दिसण्याच्या वेडापायी महिलेने केला 50 लाखांहून अधिक खर्च; आता म्हणते...
तिला असा प्रायव्हेट पार्ट बिलकुल नको होता. ती सर्जरीमुळे नाखूश आहे. खरंतर आता तिला आपल्या प्रायव्हेट पार्टबाबत लाज वाटते. महिलांनी आपलं शरीर आहे, तसं स्वीकारावं असं केसी आता इतरांना सांगते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Lifestyle, PRIVATE part