जाहिरात
मराठी बातम्या / Viral / VIDEO: हातात भलामोठा साप घेऊन खेळत होता तरुण; इतक्यात सापाने घेतला चावा, पुढे जे घडलं ते हैराण करणारं

VIDEO: हातात भलामोठा साप घेऊन खेळत होता तरुण; इतक्यात सापाने घेतला चावा, पुढे जे घडलं ते हैराण करणारं

VIDEO: हातात भलामोठा साप घेऊन खेळत होता तरुण; इतक्यात सापाने घेतला चावा, पुढे जे घडलं ते हैराण करणारं

एक मुलगा स्वतःच्या हातावर काळ्या रंगाच्या सापाला दंश करण्यास भाग पाडत असल्याचं दिसतं. थरकाप उडवणारा हा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली 23 एप्रिल : साप हा एक असा जीव आहे, जो दिसायला जरीही लहान असला तरी तो तितकाच घातकही असतो. त्यामुळं माणसं आणि मोठमोठे प्राणीही साप दिसल्यावर आपला रस्ता बदलतात. अनेकांना तर सापाचं नाव ऐकूनच घाम फुटतो. साप चावल्याने मृत्यू झाल्याच्या घटनाही अनेकदा समोर येत असतात. त्यामुळे लोकांच्या मनात अधिकच भीती निर्माण होते. मात्र, काही लोक असेही असतात, ज्यांना सापाची अजिबातही भीती वाटत नाही आणि ते अगदी सहज साप पकडतात. OMG! सोशल मीडियावर या कावळ्याचं होतंय कौतुक! VIDEO पाहून नेटिझन्स थक्क सध्या मात्र सोशल मीडियावर एक हैराण करणारा व्हिडिओ व्हायरल (Snake Shocking Video Viral) होत आहे. याच एक मुलगा स्वतःच्या हातावर काळ्या रंगाच्या सापाला दंश करण्यास भाग पाडत असल्याचं दिसतं. थरकाप उडवणारा हा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे आणि लोकांच्या पसंतीसही उतरत आहे.

जाहिरात

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की, एक मुलगा हातात काळा साप घेऊन जंगलात उभा आहे. यानंतर साप मुलाच्या हातावर चावू लागतो. मात्र, मुलावर याचा काहीही परिणाम होत नाही आणि तो हसायला लागतो. साप चावत असतानाही तो अजिबातही घाबरलेला दिसत नाही. हा व्हिडिओ खरोखरच हैराण करणारा आहे. कारण सापासारखा धोकादायक जीव पाहून कोणाचीही हवा टाईट होईल. अशात त्याला अशाप्रकारे हातावर घेणं हे मोठ्या धाडसाचं काम आहे. सापासोबत खेळ अंगाशी! जीव वाचवण्यासाठी मुलाची धडपड; धडकी भरवणारा VIDEO हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. व्हिडिओ world_of_snakes_नावाच्या पेजवरून शेअर करण्यात आला आहे. लाखो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. जवळपास दीड लाख लोकांनी हा व्हिडिओ लाइक केला आहे. अनेकांनी या व्हिडिओवर निरनिराळ्या कमेंट करत या तरुणाच्या धाडसाचं कौतुकही करत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात