Home /News /viral /

OMG! सोशल मीडियावर या कावळ्याचं होतंय कौतुक! VIDEO पाहून नेटिझन्स थक्क

OMG! सोशल मीडियावर या कावळ्याचं होतंय कौतुक! VIDEO पाहून नेटिझन्स थक्क

या कावळ्याच्या हुशारीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

    मुंबई, 22 एप्रिल : तहानलेल्या हुश्शार कावळ्याची गोष्ट तुम्हाला माहितीच आहे. कावळ्याच्या हुशारीचा प्रत्यय प्रत्यक्षातही वारंवार आला आहे. कधी नळ सुरू करून पाणी पिणारा कावळा, तर कधी रस्त्यावरील कचरा कचरापेटीत टाकणारा कावळा, असे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे तुम्ही पाहिले असतील. आता कावळ्याच्या हुशारीचा असाच आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे (Intelligent crow Video). जो पाहून सर्वजण थक्क झाले आहेत (Intelligent crow solves the puzzle). पझल किंवा कोडं म्हटलं की माणसांनाही ते सोडवणं कठीण जातं. पण एका कावळ्याने मात्र काही क्षणातच पझल सॉल्व्ह केलं आहे. माणसांना प्रत्येक गोष्टी शिकवल्या जातात. तसं प्राणी-पक्ष्यांचं नसतं. पण तरी या कावळ्याने जे केलं ते पाहून तुम्हीही अवाक् व्हाल. कोणत्याही शिक्षणाशिवाय कावळ्याने पझल सॉल्व्ह करून दाखवल्याने आश्चर्य व्यक्त केलं जातं आहे. हे वाचा - Shocking! Crow ही करू लागला Smoking, सिगारेटसाठी माणसाशी केली मैत्री अखेर...; धक्कादायक शेवट लहान मुलांच्या बौद्धिक विकासासाठी त्यांना खेळण्यासाठी काही पझल दिले जातात. त्यापैकी हा एक पझल आहे. जो कावळ्यासमोर ठेवण्यात आला आहे. ज्यामध्ये एक ब़ॉक्स आहे. त्यावर असलेल्या झाकणात काही आकाराचे होल आहेत. त्या होलात बसेल असा आकार त्यातून बॉक्समध्ये टाकायचा आहे. सोशल मीडियावर लहान मुलांचे हा पझल सोडवतानाही व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. ज्यात मुलांना पझल सोडवता आलं नाही की ते बॉक्सचं झाकण उघडतात आणि त्यातून तो आकार टाकतात. पण कावळ्याने मात्र काही क्षणातच हे पझल सोडवलं आहे. हे वाचा - कारमधून येत होता विचित्र आवाज; बोनेट उघडताच मॅकेनिकला फुटला घाम @Yoda4ever  नावाच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट कऱण्यात आला आहे. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Viral, Viral videos

    पुढील बातम्या