Home /News /viral /

सापासोबत खेळ अंगाशी! जीव वाचवण्यासाठी मुलाची धडपड; धडकी भरवणारा VIDEO

सापासोबत खेळ अंगाशी! जीव वाचवण्यासाठी मुलाची धडपड; धडकी भरवणारा VIDEO

सापासोबत खेळता खेळता मुलावर सापाने केला खतरनाक हल्ला.

  मुंबई, 22 एप्रिल : साप दिसला की अनेकांना दरदरून घाम फुटतो. पण काही लोक असे असताना ज्यांना सापासोबत खेळायला आवडतं. सापाचे असे बरेच व्हिडीओ तुम्ही सोशल मीडियावर पाहिले असतील. मोठी माणसंच नव्हे तर अगदी लहान मुलंही अवाढव्य सापांसोबत बिनधास्तपणे खेळताना दिसतात. असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. पण सापासोबत हा खेळ या मुलाच्या अंगाशी आला आहे. धडकी भरवणारा असा हा व्हिडीओ आहे (Snake attack video viral). सापासमोर उभं राहण्याचीही कुणाची हिंमत होणार नाही. पण एका मुलाने सापाला हातात घेऊन त्याच्यासोबत मस्ती करण्याचा प्रयत्न केलं. त्याने सापाला आपल्या हातात धरून तोंडाजवळ नेलं. पण शेवटी साप तो साप. त्याने आपला डाव साधलाच. व्हिडीओ पाहून तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. व्हिडीओत पाहू शकता एक मुलगा दिसतो आहे. तसं त्याचं वय जास्त नसावं. त्याने आपल्या हातात एक भलामोठा साप धरला आहे. सापाचा आकार पाहूनच आपल्या तोंडचं पाणी पळतं. इतका मोठा साप या मुलाने आपल्या हातात धरला आहे. इतकंच नव्हे तर तो त्या सापाला आपल्या तोंडावरून फिरवतो आहे. हे वाचा - VIDEO - पळव पळव पळवलं आणि शेवटी...; चवताळलेल्या उंटाने मारकुट्या मालकाचा घेतला खतरनाक बदला साप सुरुवातीला शांत दिसतो आहे. पण जेव्हा मुलगा कॅमेऱ्याकडे बघतो तेव्हा साप त्याच्यावर खतरनाक हल्ला करतो. साप त्या मुलाच्या डोक्यावर चावण्याचा प्रयत्न करतो. मुलासोबतही हे अचानक घडतं त्यामुळे तोही घाबरलेला दिसतो आणि मोठ्याने ओरडतो. तेव्हाच आपल्या काळजाचा ठोका चुकतो.
  View this post on Instagram

  A post shared by TYRESE (@tyrese)

  सापाने मुलाचे केस आपल्या तोंडात धरले आहेत. मुलगा सापाच्या तावडीतून सुटण्यासाठी धडपड करतो आहे. पण सापाने त्याच्या केसांना इतक्या घट्ट पकडलं आहे की त्याची सुटका अशक्य दिसते आहे. हे वाचा - Shocking! Crow ही करू लागला Smoking, सिगारेटसाठी माणसाशी केली मैत्री अखेर...; धक्कादायक शेवट @tyrese इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. पुढे या मुलासोबत काय झालं माहिती नाही. सुदैवाने तो नीट असावा.  पण साप किंवा अशा कोणत्याही भयानक प्राण्यासोबत असा जीवघेणा खेळ खेळण्याचा किंवा मस्ती करण्याचा प्रयत्न करू नका.
  Published by:Priya Lad
  First published:

  Tags: Viral, Viral videos

  पुढील बातम्या