तिरुअनंतपुरम 11 सप्टेंबर : माणसासमोर कधी कोणतं संकट कशाप्रकारे उभा राहील, हे कोणीही सांगू शकत नाही. बऱ्याचदा तुम्ही अशा घटनांचे व्हिडिओ पाहिले असतील ज्यात रस्त्यावरुन जाताना एखादा प्राणी गाडीवर किंवा व्यक्तीवर हल्ला करतो. काहीवेळी या हल्ल्यातून व्यक्ती बचावतो मात्र काहीवेळा यात लोकांचा जीवही जातो. विशेषतः जंगली प्राण्यांचा हल्ला अनेकदा जीवघेणा ठरू शकतो. बापरे, तब्बल 2 किमी कारला कंटनेरने नेलं फरफटत, रस्त्यावर आगीच्या ठिणग्या, LIVE VIDEO सध्या असाच एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये एका जंगली प्राण्याने ऑटोरिक्षावर हल्ला केल्याचं पाहायला मिळतं. हा जंगली प्राणी इतका रागात दिसतो की तो आपल्या शिंगांवर पूर्ण रिक्षाच उचलण्याचा प्रयत्न करतो. हा व्हिडिओ केरळमधील आहे. केरळच्या पठानमथिट्टा जिल्ह्यातील अंगमूझी आणि प्लाप्पल्ली दरम्यान सबरीमाला मार्गावर ही घटना घडली. यात एका जंगली रेड्याने ऑटोरिक्षावर हल्ला केला.
केरळ : जंगली रेड्याने चालकासह पूर्ण ऑटोरिक्षा शिंगावर उचलली अन्..., धक्कादायक घटना कॅमेऱ्यात कैद pic.twitter.com/L6cikMW0Wd
— News18Lokmat (@News18lokmat) September 11, 2022
या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ समोर आला असून हा व्हिडिओ थरकाप उडवणारा आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की एक रिक्षा सबरीमाला मार्गावरुन जात आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला दाट झाडी असल्याचं दिसतं. समोर रस्त्यावर एक जंगली रेडा उभा आहे. हे पाहून रस्त्यावरुन जाणाऱ्या गाड्या जागीच थांबतात. काही वेळात हा रेडा रस्त्यावर असलेल्या रिक्षाकडे धावत येतो. VIDEO: दिल्लीत भीक मागण्यासाठी मुंबईतून बाळांची चोरी; CCTV फुटेजमुळे भांडाफोड, महिलेला अटक रेडा रिक्षाच्या दिशेने धावत असल्याचं पाहून रिक्षाचालकही घाबरतो आणि रिक्षा वेगात मागे घेण्याचा प्रयत्न करतो. मात्र, हा रेडा रागात धावत येऊन रिक्षाला जोराने धडक देतो. ही धडक इतकी जोरात बसते की रिक्षा हवेत उचलली जाते. सुदैवाने अगदी थोडक्यात रिक्षा पलटी व्हायची राहते. यानंतर हा रेडा इथून पळ काढतो. ही संपूर्ण घटना रिक्षाच्या मागे असलेल्या गाडीतील लोकांनी कॅमेऱ्यात कैद केली आहे.