पुणे, 11 सप्टेंबर : पुणे-अहमदनगर महामार्गावर (Pune-Ahmednagar Highway) भयावह अपघाताचा व्हिडीओ समोर आला आहे. भरधाव कंटेनरने तब्बल 2 किलोमीटर कारला फरफटत नेल्याची घटना घडली आहे. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ व्हायरल झाला आहे. सुदैवाने या भीषण अपघातात कारमधील चारही प्रवासी सुखरूप आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-नगर महामार्गावर शिक्रापूरजवळ ही घटना घडली आहे. एका भरधाव कंटेनरने तब्बल 2 किलोमीटर कार फरफटत नेली आहे. अपघात इतका भयंकर होता की, भरधाव कंटेनर कारला फरफटत नेताना महामार्गावर आगीच्या ठिणग्या पाहायला मिळाल्या. ही संपूर्ण घटना महामार्गाच्या बाजूला असलेल्या हॉटेलच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
पुणे-नगर महामार्गावर भरधाव कंटेनरने तब्बल २ किलोमीटर फरफटत नेली कार pic.twitter.com/ozrOqFiZ38
— News18Lokmat (@News18lokmat) September 11, 2022
कंटनेर कारला फरफटत नेत होता, त्यावेळी रस्त्याच्या बाजूला बघ्यांची गर्दी जमा झाली होती. जो तो कार चालकाला वाचवण्यासाठी पुढे येत होता. पण, भरधाव कंटेनर तब्बल २ किमीपर्यंत फरफटत नेऊन थांबला. सुदैवाने या अपघातात कारमधील चारही प्रवासी सुखरूप आहे. पण, या अपघातात कारचे प्रचंड नुकसान झाले आहे. हा अपघात नेमका कशामुळे घडला याची माहिती समोर येऊ शकली नाही. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्त कार रस्त्याच्या बाजूला करण्यात आली आहे. उभ्या कारने अचानक घेतला पेट, अल्टो कार जळून खाक दरम्यान, अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यात जुना धामणगाव दाभाडा मार्गावर अचानक उभे असलेल्या अल्टो कारने पेट घेतला. संजय मानकर यांच्या मालकीची ही कार होती. मानकर हे आपले शहरातील कामकाज आटोपून कावली या गावी जात होते. काही कारणास्तव त्यांनी गाडी थांबविली. बाजूला होताच कारने अचानक पेट घेतला. यात कार पुर्णत जळून खाक झाली आहे. अग्निशामक दलाच्या साह्याने ही आग आटोक्यात आणण्यात आली आहे.