मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

VIDEO: दिल्लीत भीक मागण्यासाठी मुंबईतून बाळांची चोरी; CCTV फुटेजमुळे भांडाफोड, महिलेला अटक

VIDEO: दिल्लीत भीक मागण्यासाठी मुंबईतून बाळांची चोरी; CCTV फुटेजमुळे भांडाफोड, महिलेला अटक

8 सप्टेंबर रोजी एका महिलेनं मुंबईतील बोरिवली जीआरपी पोलीस स्टेशनमध्ये तिचं तीन वर्षांचं बाळ बोरिवली स्टेशनमधून बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Kiran Pharate

मुंबई 11 सप्टेंबर : मुंबईच्या बोरिवली जीआरपी पोलिसांनी एका महिलेला अटक केली आहे. तर तिचा अल्पवयीन मुलगा आणि मुलगी यांना ताब्यात घेतलं आहे, जे रेल्वे स्टेशनवरून मुलं चोरून त्यांना भीक मागायला लावत होते. 8 सप्टेंबर रोजी एका महिलेनं मुंबईतील बोरिवली जीआरपी पोलीस स्टेशनमध्ये तिचं तीन वर्षांचं बाळ बोरिवली स्टेशनमधून बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला.

'प्लिज लिफ्ट द्या'; सुनसान रस्त्यावर महिलेनं मागितली लिफ्ट अन्.., पुढे घडलं भयानक

अनेक सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर दादर स्थानकावर लावलेल्या सीसीटीव्हीमध्ये आरोपी महिला हरवलेल्या मुलासोबत दिसली. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत आरोपी महिलेला हरवलेल्या मुलासह दादर स्थानकातून ताब्यात घेतलं. ही घटना सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसत आहे, ज्यामध्ये बोरिवली रेल्वे स्टेशनच्या पुलावर अल्पवयीन मुलगी या बेपत्ता मुलाला घेऊन धावताना दिसत आहे. हे दृश्य बालक चोरीचं आहे, ज्यात मुलगी बाळाला चोरून पळून जाताना दिसत आहे.

आरोपी महिला ही दिल्लीची रहिवासी असून तिला दोन मुलंही आहेत. दोन्ही मुलांसह ही महिला 3 दिवसांपूर्वी मुंबईत आली. यानंतर तिने पोलिसांत तक्रार दिलेल्या महिलेसोबत ओळख वाढवली आणि मग संधी मिळताच महिलेच्या तीन वर्षांच्या मुलाला घेऊन पळून गेली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत आरोपी महिलेच्या दोन्ही मुलांनीही तिची साथ दिली.

बाप-लेकीच्या नात्याला काळीमा, पित्याकडून 14 वर्षाच्या पोटच्या मुलीवर वारंवार बलात्कार, संतापजनक घटना

पोलिसांनी तीन वर्षांच्या मुलाला सुखरूपपणे त्याच्या आईच्या स्वाधीन केलं. यानंतर शनिवारी आरोपी महिलेला न्यायालयात हजर करण्यात आलं. त्यानंतर न्यायालयाने आरोपी महिलेला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तर, या कामात महिलेची साथ देणाऱ्या तिच्या मुलाला आणि मुलीलाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

First published:

Tags: Baby kidnap, Crime news