मराठी बातम्या /बातम्या /देश /

भाजप आमदारानं माझ्या थोबाडीत मारली, उत्तर प्रदेशमधल्या पोलीस अधिकाऱ्याचा हतबल करणारा Video Viral

भाजप आमदारानं माझ्या थोबाडीत मारली, उत्तर प्रदेशमधल्या पोलीस अधिकाऱ्याचा हतबल करणारा Video Viral

Uttar Pradesh viral video: सध्या उत्तर प्रदेशमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर (Election) मोठ्या प्रमाणात हिंसक घटना घडत आहेत. त्यातच उत्तर प्रदेशमधील एक व्हिडिओ  सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे.

  • Published by:  Pooja Vichare

लखनऊ, 11 जुलै: सध्या उत्तर प्रदेशमध्ये (Uttar Pradesh) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर (Election) मोठ्या प्रमाणात हिंसक घटना घडत आहेत. त्यातच उत्तर प्रदेशमधील एक व्हिडिओ (Viral Video) सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एक वरिष्ठ पोलीस अधिकारी (UP Police SP) हतबल होऊन आपल्या वरिष्ठांकडे तक्रार करत आहे. या व्हिडिओत संबंधित पोलीस अधिकाऱ्यानं भाजपच्या आमदार (BJP MLA) आणि जिल्हाध्यक्षांनं आपल्याला थोबाडीत मारल्याचं सांगितलं. तसंच हिंसा भडकवण्यासाठी बॉम्ब आणल्याचं आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्याला सांगत आहे.

पोलीस अधिक्षक प्रशांत कुमार यांचा एक व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. प्रशांत कुमार व्हिडिओत, मुझे भी थप्पड़ मारा" "ये बम भी ले कर आए हैं , बीजेपी वाले, विधायक और ज़िलाध्यक्ष" असं बोलत आहेत.

या व्हिडिओ ईटवाह जिल्ह्यातील आहे. तसंच या व्हिडिओनंतर योगी सरकार या घटनेतील आरोपींवर कारवाई करेल का असाच प्रश्न उपस्थित केला जात आहे.

हेही वाचा- बैलगाडी पडल्यानंतर खिल्ली उडवणाऱ्या भाजपला भाई जगताप यांचं खरमरीत उत्तर

उत्तर प्रदेशमध्ये सध्या हिंसा भडकली आहे. पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशमधील स्थानिक निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणात शक्तीप्रदर्शन करण्यात आलं. मात्र, निकालानंतर अनेक ठिकाणी लाठीकाठ्यांपासून बॉम्बचा वापर होऊन हिंसा भडकली.

First published:

Tags: Uttar pradesh, Video viral, Yogi Aadityanath