नवी दिल्ली 30 मे : सोशल मीडिया हे असे जग आहे, जिथे दररोज नवनवे व्हिडिओ व्हायर होत राहतात. यातील काही व्हिडिओ असे असतात जे पाहून आपलाच आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नाही. विशेषतः सोशल मीडियावर प्राणी आणि पक्षांशी संबंधित व्हिडिओ अधिक पाहायला मिळतात. यातील काही व्हिडिओ भावनिक तर काही व्हिडिओ आश्चर्यकारक असतात. अनेकदा हे व्हिडिओ पाहिल्यानंतर आपलं मन प्रसन्न होतं.
बसच्या सीटवरुन मुलींमध्ये लाथा-बुक्क्यांनी मारहाण; मध्यस्थी करायचं सोडून बघ्यांनी शूट केला Video
असाच एक धक्कादायक व्हिडिओ (Bird Fly With Pizza) सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक पक्षी आकाशातून उडत येतो आणि असं आश्चर्यकारक कृत्य करतो, जे पाहून लोकांचा डोळ्यांवर विश्वास बसत नाही. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. तुम्हाला हे पाहून आश्चर्य वाटेल की एक पक्षी आकाशातून उडून जमिनीकडे येतो आणि संपूर्ण पिझ्झा घेऊन पुन्हा आकाशात भरारी घेतो. व्हिडिओ (Bird Viral Video) पाहून लोकांना प्रश्न पडला आहे की एवढा जड पिझ्झा घेऊन पक्षी कसा उडू शकतो.
View this post on Instagram
व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं, की एका मुलीने पिझ्झा ऑर्डर केलेला आहे. यानंतर, ती हा पिझ्झा बागेत ठेवते आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग सुरू करते. मग एक पक्षी आकाशातून उडत खाली येतो आणि पूर्ण पिझ्झा आपल्या चोचीने पकडून पुन्हा आकाशात उडतो. तरुणी संपूर्ण व्हिडिओ रेकॉर्ड करत राहाते. ही बाब मुलीच्या लक्षात येईपर्यंत बराच उशीर झालेला असतो आणि पक्षी पिझ्झा घेऊन उडून गेलेला असतो.
VIDEO बनवणाऱ्या तरुणीसोबत माकडाचं अश्लील कृत्य; पाहून तुम्हीही व्हाल शॉक
तुम्ही पाहू शकता की पक्षी निघून गेल्यानंतर ही तरुण टेबलाजवळ जाते आणि पिझ्झाचा रिकामा बॉक्स पाहून निराश होते. @roberttolppi नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे. व्हिडिओ पाहून लोक म्हणत आहेत की, तरुणीचा पिझ्झा खाण्याचा संपूर्ण फ्लॉप झाला आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत 8 हजारहून अधिकांनी लाईक केला आहे. अनेकांनी कमेंट करून हा व्हिडिओ फेक असल्याचंही म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Pizza, Viral video on social media