Home /News /viral /

बसच्या सीटवरुन मुलींमध्ये लाथा-बुक्क्यांनी मारहाण; मध्यस्थी करायचं सोडून बघ्यांनी शूट केला Video

बसच्या सीटवरुन मुलींमध्ये लाथा-बुक्क्यांनी मारहाण; मध्यस्थी करायचं सोडून बघ्यांनी शूट केला Video

कुस्तीचा खेळ पाहिल्यासारखं बघे आरडाओरडा करीत होते. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

    चंदीगड, 29 मे : हरयाणातील (Haryana News) रेवाडी जिल्ह्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Viral Video On Social Media) व्हायरल होत आहे. या व्हिडीओत जिल्ह्याच्या बस स्टँडवर काही मुली एकमेकांसोबत भांडताना दिसत आहे. काही तरुणी हे भांडण सोडवण्याचा प्रयत्नही करीत आहे. तर काही जणं यांचं भांडण सोडवण्याऐवजी व्हिडीओ शूट करताना दिसत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, बसच्या सीटवरुन या मुलींमध्ये वाद सुरू झाला होता. यानंतर हा वाद मारामारीमध्ये बदलला. तर काही लोकांनी याचा व्हिडीओ शूट करून सोशल मीडियावर व्हायरल केला. शेवटी पोलीस आल्यानंतर त्यांनी मुलींमधील भांडण थांबवलं. व्हायरल व्हिडीओ रेवाडी जिल्ह्यातील बस स्टँडचा आहे. येथे कॉलेजच्या काही मुलींमध्ये सीटवर बसण्यावरुन वाद सुरू झाला. यानंतर त्यांच्यामध्ये मारामारी सुरू झाली. यादरम्यान मुली एकमेकींना लाथा-बुक्क्यांनी मारत होत्या. काही मुलींना त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या ऐकत नव्हत्या. मुलींच्या मारामारीचा हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लोक यावर विविध प्रकारच्या कमेंटही करीत आहेत. शेवटी पोलीस आल्यानंतर हे भांडण थांबलं. मात्र पोलिसांनी मुलींना त्यांच्या घरी पाठवून दिलं.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Haryana, Viral video.

    पुढील बातम्या