नवी दिल्ली 10 सप्टेंबर : सोशल मीडियावर (Social Media) सतत वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत असतात. यातील काही व्हिडिओ असे असतात जे इंटरनेटवर अक्षरशः धुमाकूळ घालतात. सध्या असाच एक व्हिडिओ समोर आला आहे. यात एक पक्षी कॅमेऱ्यात कैद झाला आहे, जो एका स्टोअरच्या बाहेर फिरताना दिसत आहे. काही वेळानंतर हा पक्षी स्टोअरच्या आतमध्ये जातो आणि एक चिप्सचं पॅकेट (Chips Packet) उचलून घेऊन येतो. यावर विश्वास ठेवणं कठीण असलं तरी हे खरं आहे. याचा पुरावा 47 सेकंदाच्या व्हिडिओमध्ये (Viral Video of Bird) कैद झाला आहे.
VIDEO - तरुणांनी स्वतःला आगीत झोकून दिलं; Burning car मधून वृ्द्धांना वाचवलं
या व्हिडिओमध्ये पक्षी अगदी आरामात दुकानासमोर फिरताना दिसतो. काही वेळ तो गेट उघडण्याची वाट बघतो आणि गेट उघडताच तो आतमध्ये जातो. यानंतर आपल्या चोचीमध्ये चिप्सचं एक पॅकेट पकडतो. यानंतर हे पॅकेट घेऊन बाहेर येत ते खोलून खाऊ लागतो.
This sneaky seagull pulls off the cheesiest heist its life! 😂😋🐱👤#viralhog #seagull #sneaky #snacks #England pic.twitter.com/VoHzfITPCB
— ViralHog (@ViralHog) August 13, 2021
हा व्हिडिओ व्हायरल हॉगच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर (Twitter Video) अपलोड केला गेला आहे. या व्हिडिओला नेटकऱ्यांची चांगलीच पसंती मिळत आहे. अनेकांनी यावर कमेंटही केल्या आहेत. या व्हिडिओला आतापर्यंत भरपूर लाईक आणि रिट्विटही मिळाले आहेत.
अरे बापरे! थेट कारवरच चढलं अस्वल आणि...; पुढे काय घडलं पाहा VIDEO
एका यूजरनं कमेंट करत म्हटलं, की हा पक्षी अतिशय हुशार आहे. दुसऱ्या एका यूजरनं लिहिलं, की पक्षी अतिशय स्मार्ट असतात. आणखी एकानं कमेंट करत लिहिलं, की अशा पक्षांना किंवा प्राण्यांना प्राणी संग्रहालयात ठेवलं पाहिजे, ते सर्वांचं मनोरंजन करतील.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.