वॉशिंग्टन, 09 सप्टेंबर : काही लोक असे आहेत, जे साधं रस्त्यावर कुणी पडलं तर त्यांना उभं राहण्यासाठी साधा हातही पुढे करत नाहीत. तर काही जण असे असतात जे दुसऱ्याला वाचवण्यासाठी स्वतःचाही जीव धोक्यात घालतात (Car accident video). असाच एक बचावाचा थरारक व्हिडीओ (Rescue video) सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral video) होतो आहे. दोन तरुणांनी वृद्ध दाम्प्त्याला पेटत्या कारमधून बाहेर काढण्यासाठी स्वतःला आगीत झोकून दिलं आहे (Burning car video).
अमेरिकेच्या कॅलिफोर्नियातील (California) लेकसाइडमध्ये (Lakeside) भयंकर कार दुर्घटना झाली. एका कारने रस्त्यावर पेट घेतला. कार आगीच्या विळख्यात होती आणि कारमध्ये अडकलं होतं वृद्ध दाम्पत्य. त्यांना बाहेर कसं पडावं तेच समजत नव्हतं. जीव वाचवण्यासाठी ते ओरडत होते.
View this post on Instagram
तिथून प्रवास करणारे दोन तरुण त्यांच्या मदतीसाठी धावत आले. तिथं धावत आले आणि त्यांनी वृद्धाना वाचवण्यासाठी स्वतःला आगीसमोर झोकून दिलं.
हे वाचा - अरे बापरे! थेट कारवरच चढलं अस्वल आणि...; पुढे काय घडलं पाहा VIDEO
कारच्या मागच्या बाजूने आग लागली होती. निम्मी कार आगीच्या विळख्यात होती. ज्याच्या ज्वाळा हवेने कारच्या पुढपर्यंत जात होता. तरीसुद्धा तरुणांनी आपला जीव धोक्यात घातला. पेटत्या कारच्या जवळ ते गेले आणि दोघांनीही दोन बाजूंचे दरवाजे उघडत त्या दोन्ही वृद्धांना बाहेर काढलं. त्यांना कारपासून दूर नेलं. वृद्धांची अवस्था खूप बेकार झाली होती. पेटलेल्या कारमध्ये त्यांचा जीव घुसमटला होता.
हे वाचा - बोट बुडतानाचा Live Video, पाहिल्यावर अंगावर काटा उभा राहील
तिथून जाणाऱ्या एका प्रवाशानेच हे दृश्य आपल्याजवळील कॅमेऱ्यात कैद केलं. यानंतर तात्काळ अग्निशमन दलाला बोलावण्यात आलं. अग्निशमन दलाने घटनास्थळी येत कारला लागलेली आग विझवली. lakesidefiredist इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहून वृद्धांसाठी देवदूताप्रमाणे धावून आलेल्या या दोन हिरोंचं सोशल मीडियावर कौतुक केलं जातं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Health, Lifestyle, Viral, Viral videos