मुंबई, 12 जून : भारतातील काही राज्यांना आणि समुद्रकिनाऱ्यावरील भागांना अलो अलर्ट दिला गेला आहे. 15 जूनला दुपारी बिपरजॉय वादळ काही भागांवर येऊन धडकणार असल्याचं हवामानशास्त्र विभागाने सांगितलं आहे. बिपरजॉयच्या पार्श्वभूमीवर गुजरामधील कच्छ आणि सौराष्ट्र, तसेच कोकण किनारपट्टीवर परिणाम होणार असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र ते मांडवी ते कराचीदरम्यान कुठे धडकणार याबाबत अद्याप स्पष्टता नाही. चक्रीवादळामुळे 14 जून आणि 15 जूनदरम्यान गुजरातमधील कच्छ, द्वारका, पोरबंदर, जामनगर, राजकोट, जुनागड, आणि मोरंबी जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. बिपरजॉयमुळे हे सर्व जिल्हे प्रभावित होणार आहेत. पण बिपरजॉय वादळ हे नाव या वादळाला कसं काय दिलं गेलं? या चक्री वादळांचं नाव कोण ठरवतं किंवा येणाऱ्या वादळाचं नाव हवामान विभागाला कसं कळतं? असा प्रश्न कधी मनात आलाय? Cyclone Biporjoy : 125 ते 135 किमी वेगानं धडकणार बिपरजॉय चक्रीवादळ, या जिल्ह्यांत अतिमुसळधार पावसाचा अंदाज खरंतर समुद्रात एखाद चक्रीवादळ निर्माण झालं किंवा शक्यता दिसली की हवामान खात्याकडून त्याचं नामकरण केलं जातं. वादळांची ही चमत्कारिक नावं देण्याचा प्रथा तशी जुनीच आहे. म्हणजे गेल्या शतकभरापासून चक्रीवादळांना नावं दिली जातात. यातली गंमतीची बाब म्हणजे, वादळाचं बारसे करण्यासाठी काही आंतरराष्ट्रीय संकेत सुद्धा आहेत. शिवाय वादळांचं बारसं करण्याची काही महत्त्वाची कारणं आहेत. ज्यामुळे त्यांना ठरावीक नावं ठेवली जातात. वादळ पुढं सरकत असताना देशादेशात माहितीची देवाणघेवाण होतं असते. माहितीची देवाणघेवाण करत असताना एकाच वादळाला जर विविध नावानं संबोधलं गेलं तर घोळ निर्माण होऊ शकतो. अफवांना देखील ऊत येऊ शकतो. त्यामुळे हे सर्व टाळण्यासाठी वादळ निर्माण होणार्या आणि त्याच्या प्रभावाखाली येणार्या भौगोलिक प्रदेशातील देश मिळून एखाद्या सांकेतिक नावाचा वापर करतात. Interesting Fact : एका मिनिटात शिकार झाली नाही तर शिकार सोडून देतो चित्ता, तुम्हाला हे माहित होतं का? विशेषतः ताशी 65 किमीपेक्षा अधिक वेगाच्या चक्रीवादळाचं नामकरण केलं जातं. वादळांना नाव देण्याची पाश्चिमात्य देशांकडून सुरुवात झाली. अमेरिकेकडून चक्रीवादळांना महिलांची नावं दिली जातात. तसेच प्रादेशिक वैशिष्ट्यांची नावं देण्याचाही विचार असतो. वादळांना नावं देताना कुणाच्या भावना दुखवणार नाहीत, याचीही काळजी घेतली जाते. ज्यामुळे वादळाचं नाव थोडं विचित्र ठेवलं जातं. एखाद्या वादळाचा परिणाम कित्येक देशांना भोगावा लागतो. तेव्हा हे वादळ एकाच देशाचं न राहता, वादळ निर्मितीस कारणीभूत असलेल्या महासागरीय प्रदेशांच्या झोननुसार याचं नाव ठरवणं आवश्यक असतं. प्रत्येक देशाचे महासागरानुसार काही झोन पाडण्यात आले. भारत हा नॉर्थ इंडियन ओशनिक झोनमध्ये येतो. त्यामुळे त्या-त्या झोनमध्ये येणाऱ्या देशांनी त्याची नावं सुचवायची असतात. भारतानं 2004 सालात उत्तर हिंदी महासागरात येणार्या वादळांना नावं देण्याची परंपरा सुरु केली. भारताच्या भौगोलिक अथवा सागरी क्षेत्रात निर्माण होणार्या चक्रीवादळांना नावं देताना भारतीय हवामान खातं भारतीय उपखंडातल्या इतर देशांच्या वेधशाळांशी संपर्क करतं. भारताच्या झोनमध्ये ओमान, पाकिस्तान, मालदीव, श्रीलंका, बांग्लादेश, म्यानमार, थायलँड हे देश आहेत. यांच्याशी संपर्क करून सर्वांच्या संमतीनं एखादं नाव निश्चित केलं जातं. बिपरजॉय वादळाचं नाव कसं ठरवलं गेलं? ‘बिपरजॉय’ हे नाव बांगलादेशनं सुचवलं होतं. ‘बिपरजॉय’ हे नाव बांगलादेशने तयार केले. बंगालीमध्ये ‘बिपरजॉय’ नावाचा अर्थ डिजास्टर किंवा आपत्ती असा होतो. जागतिक हवामान संघटना (WMO) नुसार, प्रत्येक चक्रीवादळ संस्थेने दिलेल्या वर्णमाला नावाने ओळखले जाते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.