जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Cyclone Biporjoy : 125 ते 135 किमी वेगानं धडकणार बिपरजॉय चक्रीवादळ, या जिल्ह्यांत अतिमुसळधार पावसाचा अंदाज

Cyclone Biporjoy : 125 ते 135 किमी वेगानं धडकणार बिपरजॉय चक्रीवादळ, या जिल्ह्यांत अतिमुसळधार पावसाचा अंदाज

बिपरजॉय चक्रीवादळाबाबत महत्त्वाची अपडेट

बिपरजॉय चक्रीवादळाबाबत महत्त्वाची अपडेट

बिपरजॉय चक्रीवादळाबद्दल हवामान विभागाकडून महत्त्वाची अपडेट देण्यात आली आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 12 जून, विशाल पाटील :  बिपरजॉय चक्रीवादळाबद्दल हवामान विभागाकडून महत्त्वाची अपडेट देण्यात आली आहे. बिपरजॉय चक्रीवादळ मुंबईच्या समांतर पुढे सरकलं आहे. बिपरजॉयच्या पार्श्वभूमीवर गुजरामधील कच्छ आणि सौराष्ट्रमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. बिपरजॉय चक्रीवादळ 15 जूनच्या दुपारी ताशी 125 ते 135 किलोमीटर वेगानं धडकणार असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. मात्र ते मांडवी ते कराचीदरम्यान कुठे धडकणार याबाबत अद्याप स्पष्टता नाही. अतिमुसळधार पावसाचा अंदाज  चक्रीवादळामुळे 14 जून आणि 15 जूनदरम्यान गुजरातमधील कच्छ, द्वारका, पोरबंदर, जामनगर, राजकोट, जुनागड, आणि मोरंबी जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. बिपरजॉयमुळे हे सर्व जिल्हे प्रभावित होणार आहेत. जामनगर परिसरात अनेक तेल कंपन्यांच्या रिफायनरी, सोबतच कांडला पोर्ट देखील असल्यानं या भागात चक्रीवादळामुळे मोठं आर्थिक नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. राज्यात काय स्थिती?  दुसरीकडे आज महाराष्ट्रात उत्तर कोकण आणि मुंबई किनारपट्टी लगतच्या भागात वाऱ्याचा वेग अधिक असणार आहे. सोबतच काही भागात पावसाची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. बिपरजॉय चक्रीवादळ येत्या 15 जूनला धडकणार आहे. त्यानंतर पुढील दोन ते तीन दिवसांत गुजरात, राजस्थान आणि दिल्लीमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Monsoon Update : प्रतिक्षा संपली अखेर राज्यात मान्सूनचं आगमन!

राज्यात मान्सूनचं आगमन 

दरम्यान रविवारी राज्यात मान्सूनंच आगमन झालं आहे. दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्राचा काही भाग मान्सूनं व्यापाला आहे. संपूर्ण गोव्यात तसेच कर्नाटक, तामिळनाडू आणि आंध्रप्रदेशचा काही भाग मान्सूनं व्यापला आहे. याबाबत हवामान तज्ज्ञ के. एस होसाळीकर यांनी ट्विट करून माहिती दिली आहे. लवकरच उर्वरीत महाराष्ट्र देखील मान्सून व्यापण्याची शक्यता आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात