जाहिरात
मराठी बातम्या / Viral / Interesting Fact : एका मिनिटात शिकार झाली नाही तर शिकार सोडून देतो चित्ता, तुम्हाला हे माहित होतं का?

Interesting Fact : एका मिनिटात शिकार झाली नाही तर शिकार सोडून देतो चित्ता, तुम्हाला हे माहित होतं का?

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

चित्ता लांब अंतरापर्यंत धावू शकत नाही, हे ऐकून तुम्हाला विश्वास बसत नसेल पण हे खरं आहे. असेच काही चित्ताचे Interesting Facts जाणून घ्या.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 12 जून : सिंह, वाघ आणि बिबट्या हे जंगलातील सर्वात धोकादायक शिकारी आहेत. ते सर्वात वेगवान आणि ताकदवर शिकारी आहेत. त्यांनी एकदाका एखाद्याची शिकार करण्याची ठरवली तर त्यांना कोणीही यांच्या तावडीतून सोडवू शकत नाही. आज आम्ही तुम्हाला चित्ताविषयी काही रंजक गोष्टी सांगणार आहोत. ज्याबद्दल कदाचित फारच कमी लोकांना ठावूक असेल. चित्ता साधारणत: ताशी 112 किमी वेगाने धावतो, त्यामुळे तो जगातील सर्वात वेगाने धावणारा प्राणी आहे. परंतु त्याचा जास्तीत जास्त धावण्याचा वेग ताशी 120 किमी असू शकतो. असं असलं तरी चित्ता लांब अंतरापर्यंत धावू शकत नाही. तो फक्त एक मिनिट त्याच्या कमाल वेगाने धावू शकते. त्यानंतर तो थकतो आणि त्याचा वेग मंदावतो. एकटी म्हैस सात सिंहावर भारी; कळपाची अशी अवस्था, पाहून डोळ्यावर बसणार नाही विश्वास चित्ताचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे तो केवळ तीन सेकंदात 100 किमी प्रति तासाचा वेग गाठू शकतो. चित्ता वेगात धावत असताना 23 फूट म्हणजे सुमारे सात मीटर लांब उडी मारू शकतो. चित्ता 300 ते 450 मीटर अंतरावर पूर्ण वेगाने धावू शकतो. वाघ, सिंह, बिबट्या आणि जग्वार यांच्या तुलनेत चित्त्याचे डोके खूपच लहान असते, त्यामुळे वेगाने धावताना त्याच्या डोक्यावर आदळणाऱ्या हवेचा प्रतिकार खूपच कमी होतो. चित्ताची कवटी पातळ हाडांनी बनलेली असते, त्यामुळे डोक्याचे वजन खूपच कमी असते. यामुळे चित्त्याला वेगाने धावणे सोपे जाते. हॉवर्ड येथे 1973 साली झालेल्या एका संशोधनानुसार, चित्त्याच्या शरीराचे तापमान साधारणपणे 38 डिग्री सेल्सिअस असते, परंतु जास्त वेगाने धावताना शरीराचे तापमान 40.5 डिग्री सेल्सियसपर्यंत पोहोचते. चित्ताचा मेंदू उष्णता सहन करू शकत नाही, ज्यामुळे तो अचानक धावणे बंद करतो. जेव्हा चित्ता जास्त वेगाने धावतो तेव्हा त्याच्या स्नायूंना जास्त ऑक्सिजनची आवश्यकता असते. चित्ताच्या नाकपुड्यांबरोबरच श्वासनलिकाही जाड असते, जी ऑक्सिजनचा पुरवठा व्यवस्थित ठेवते. त्यामुळे कमी श्वास घेऊनही चित्त्याच्या शरीरात जास्त ऑक्सिजन पोहोचतो.

News18लोकमत
News18लोकमत

सरळ दिशेने डोळे असल्यामुळे, चित्ता अनेक मैल सहज पाहू शकतो, ज्यामुळे त्याची शिकार किती दूर आहे याचा अंदाज लावता येतो. चित्ताच्या डोळ्यांमध्ये इमेज स्टॅबिलायझेशन सिस्टीम असते, ज्यामुळे तो वेगाने धावत असतानाही आपल्या शिकारावर लक्ष केंद्रित करतो. चित्ताचे हृदय सिंहाच्या हृदयापेक्षा साडेतीन पट मोठे असते, त्यामुळे धावताना त्याला भरपूर ऑक्सिजन मिळतो. हे शरीरात वेगाने रक्त पंप करते आणि ऑक्सिजन स्नायूंपर्यंत पोहोचते. चित्ता आपल्या भक्ष्याला एका मिनिटात मारतो. जर ते एका मिनिटात शिकार मारत नसेल तर तो पुन्हा त्याचा पाठलाग करत नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात