नवी दिल्ली, 04 फेब्रुवारी : बिल गेट्सच्या यांच्या चपाती बनवण्याच्या व्हिडीओने सोशल मीडिया युझर्सचे लक्ष वेधून घेतले आणि हा व्हिडीओ पाहताच व्हायरल होऊ लागला. अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदींनीसुद्धा हा व्हिडीओ पाहिला. त्यानंतर मोदी स्वतःला आवरू शकले नाही. व्हिडीओ पाहताच त्यांनी लगेच आपल्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ पोस्ट केला आणि याबाबत आपली प्रतिक्रियाही दिली आहे.
अमेरिकेचे प्रसिद्ध शेफ इटन बर्नाथ आणि बिल गेट्स यांनी मिळून चपाती बनवली. भारतात आलेला इटन बिहारमध्ये गेला. तिथं तो अनोखी रेसिपी शिकला, जी भारतीयांसाठी सामान्य आहे. ती म्हणजे रोटी. अखेर ईटनने त्याच्या शोमध्ये हा भारतीय पदार्थ दाखवण्याचं ठरवलं तेव्हा त्याच्यासोबत जगातील प्रसिद्ध उद्योगपती बिल गेट्स देखील होते.
हे वाचा - आयला! हे कसं केलं? असा जबरदस्त Magic Video पाहून तुम्हीही चक्रावून जाल
ईटन आणि बिल गेट्स दोघांनी मिळून चपाती बनवायला सुरुवात केली. त्यांनी अगदी पिठ मळण्यापासून सुरुवात केली. त्यानंतर पिठाचा गोळा करणं आणि मग त्याची चपाती करुन ती भाजणं आणि खाणं इथपर्यंत सगळं त्यांनी केलं. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे.
या व्हिडीओमध्ये तुम्ही हे स्पष्ट पाहू शकता की भारतींयासाठी जितकं चपाती बनवणं सोप्पं आहे, त्यापेक्षा खूपच जास्त कठीण हे परदेशी लोकांसाठी आहे. ही चपाती बनवताना बिल गेट्स यांना खूप कष्ट घ्यावे लागले आहे. पण अखेर जेव्हा त्या दोघांनी ही तुप आणि रोटी खाल्ली तेव्हा ती त्यांना खूपच आवडली.
हे वाचा - गाडीसाठी आजोबांनी केला देसी जुगाड, VIDEO पाहताच भडकले नेटकरी,नेमकं काय केलं?
या व्हिडीओवर लोक कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव पाडत आहे. या व्हिडीओला भरभरुन व्ह्यूज मिळाले आहेत. पंतप्रधान मोदींनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे.
.@BillGates and I had a blast making Indian Roti together. I just got back from Bihar, India where I met wheat farmers whose yields have been increased thanks to new early sowing technologies and women from "Didi Ki Rasoi" canteens who shared their expertise in making Roti. pic.twitter.com/CAb86CgjR3
— Eitan Bernath (@EitanBernath) February 2, 2023
ते म्हणाले, "शानदार बिल गेट्स! भारतात आता बाजरी खूप आवडीने खातात, जे आरोग्यासाठीही खूप चांगलं मानलं जातं. बाजरीचेही बरेच पदार्थ आहेत. जे तुम्ही बनवण्याचा प्रयत्न करू शकता"
बिल गेट्स यांच्या चपातीचा हा व्हिडीओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन आम्हाला नक्की सांगा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bill gates, PM Modi, PM Narendra Modi, Viral, Viral videos