मराठी बातम्या /बातम्या /Viral /आयला! हे कसं केलं? असा जबरदस्त Magic Video पाहून तुम्हीही चक्रावून जाल

आयला! हे कसं केलं? असा जबरदस्त Magic Video पाहून तुम्हीही चक्रावून जाल

मॅजिक व्हिडीओ.

मॅजिक व्हिडीओ.

हा जादूचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Delhi, India

मुंबई, 03 फेब्रुवारी : लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला जादू पाहायला आवडतं. तुम्ही जादूचे खेळ टीव्हीवर किंवा प्रत्यक्षात पाहिले असले. एखाद्या मॅजिक शोला तुम्ही गेला असाल. जादू म्हणजे काही चमत्कार नाही तर हाथ की सफाई आहे हे आपल्याला माहिती असतं. पण काही मॅजिक असे असतात की ते पाहून आपण थक्क होतं. आपला आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नाही. हे कसं शक्य आहे? असाच विचार आपण करतो. असाच एक मॅजिक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.

एका रेस्टॉरंटमध्ये बसलेल्या व्यक्तीने त्याच्यासोबत असलेल्या महिलेला ही जादू दाखवली. कुणीतरी ही जादू कॅमेऱ्यात कैद केली आणि त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला. व्हिडीओ सोशल मीडियावर येताच तो व्हायरल होऊ लागला. ही जादू पाहून अनेक जण थक्क झाले आहेत. आता अशी ही जादू आहे काय? या व्यक्तीने नेमकं असं काय केलं? काय दाखवलं? हे पाहण्याची उत्सुकता तुम्हाला असेल नाही का? चला तर मग पाहुयात व्हिडीओ.

हे वाचा - काय तो अ‍ॅट्यिट्युड, काय ती पोझ; अस्वलालाही आवरला नाही Selfie चा मोह; काढले तब्बल 400 PHOTO

व्हिडीओत तुम्ही पाहू शकता एक महिला आणि पुरुष दिसत आहेत. ते एका टेबलजवळ खुर्चीवर बसले आहेत. पुरुषासमोर एक रिकामी प्लेट आहे. तो महिलेला मॅजिक दाखवतो असं सांगतो. महिलाही पाहायला तयार होते. त्यानंतर तो असं काही करून दाखवतो जे पाहून महिला हैराण होते. व्हिडीओ पाहून तुम्हीही चक्रावून जाल.

ती व्यक्ती रिकाम्या प्लेटवर एक कपडा ठेवतो आणि लगेच तो कपडा हटवतो. जसा तो प्लेटवरून कपडा काढतो तसं रिकाम्या प्लेटमध्ये पदार्थ दिसतात. आता हे या व्यक्तीने नेमकं केलं तरी कसं ते पाहण्यासाठी हा व्हिडीओ पाहा.@NextSkillslevel ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. डिनर अँड शो असं या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे.

हे वाचा - आठवतेय का ही मेट्रोतील Manjulika; प्रत्यक्षात कोण आहे ती? पाहा तिची Real Life

व्हिडीओ पाहून बहुतेक जण हैराण झाले आहेत. कुणी हे नेमकं कसं केलं सांगू शकतं का? असं एका युझरने विचारलं आहे. एकाने हा व्हिडीओ एडिट केलेला असल्याचं म्हटलं आहे. तर एकाने त्याने खाणं कपड्यात लपवून ठेवल्याचं म्हटलं आहे.

तुम्हाला हा व्हिडीओ पाहून काय वाटतं? या व्यक्तीने ही जादू कशी केली असेल? तुम्ही सांगू शकता का? या व्हिडीओतून तुम्हाला समजलं किंवा ही मॅजिक ट्रिक तुम्हाला माहिती असेल तर आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन नक्की सांगा.

First published:

Tags: Viral, Viral videos