जाहिरात
मराठी बातम्या / Viral / प्लॅटफॉर्मवर प्रवाशांची गर्दी, रेल्वेसमोर उडी मारणार; तेवढ्यात...धक्कादायक CCTV VIDEO

प्लॅटफॉर्मवर प्रवाशांची गर्दी, रेल्वेसमोर उडी मारणार; तेवढ्यात...धक्कादायक CCTV VIDEO

व्हायरल व्हिडीओ

व्हायरल व्हिडीओ

आजकाल आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढलं आहे. तरुणांपासून वृद्धापर्यंत सर्वजण हे टोकाचं पाऊल उचलत आहेत. दररोज कुठून ना कुठून तरी अशा धक्कादायक घटना समोर येत असतात.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

नवी दिल्ली, 8 एप्रिल : आजकाल आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढलं आहे. तरुणांपासून वृद्धापर्यंत सर्वजण हे टोकाचं पाऊल उचलत आहेत. दररोज कुठून ना कुठून तरी अशा धक्कादायक घटना समोर येत असतात. त्यामुळे नागरिकांमध्येही याविषयी भीती निर्माण झाली आहे. असाच एक व्हिडीओ समोर आलाय ज्यामध्ये तरुणी आपला जीव देण्याच्या प्रयत्नात होती आणि एका व्यक्तीने देवदुतासारखं येत तिचा जीव वाचवला. या संपूर्ण घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे. समोर आलेल्या व्हिडीओमध्ये, व्हिडिओमध्ये काही प्रवासी प्लॅटफॉर्मवर ट्रेनची वाट पाहत उभे असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, एक मुलगी अचानक धावू लागते आणि प्लॅटफॉर्मवरून सरळ ट्रॅकवर उडी मारण्याचा प्रयत्न करते, पण एक माणूस तिला पकडतो आणि वर खेचतो. मुलीला ओढत असतानाच ट्रेन लगेच फलाटवर पोहोचते. तोपर्यंत इतर काही लोकही त्याच्या मदतीसाठी तिथे पोहोचतात. हे प्रकरण कुठले आहे ते माहित नाही, पण हा व्हिडीओ सध्या सर्वांचं लक्ष वेधत आहे.

News18लोकमत
News18लोकमत

@cctvidiots नावाच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. 20 सेकंदांचा हा व्हिडीओ इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे. तरुणीचाा जीव वाचवणाऱ्या व्यक्तीचं लोक कौतुक करत आहेत. व्हिडीओवर वेगवेगळ्या कमेंट आि लाईक्स येत आहेत.

जाहिरात

दरम्यान, यापूर्वीही असे अनेक व्हिडीओ समोर आले आहेत. ज्यामध्ये जीव देत असलेल्या व्यक्तीचा प्राण वाचवण्यात आला. रेल्वे स्थानकावर अशा घटना घडण्याचं प्रमाण जास्त आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात