जाहिरात
मराठी बातम्या / Viral / चमत्कार! अपघात झाला आणि अपघातानेच तरुणाचा जीव वाचवला; नेमकं काय घडलं पाहा VIDEO

चमत्कार! अपघात झाला आणि अपघातानेच तरुणाचा जीव वाचवला; नेमकं काय घडलं पाहा VIDEO

ट्रक-बाईकचा अपघात.

ट्रक-बाईकचा अपघात.

बाईक आणि ट्रकच्या अपघाताचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.

  • -MIN READ Delhi
  • Last Updated :

मुंबई, 26 मार्च : अपघाता मुळे वाचला जीव… बातमीचा मथळा वाचूनच तुम्हाला प्रश्न पडला असेल की काही टायपिंग मिस्टेक तर नाही ना? की तुम्ही काही चुकीचं वाचत आहात? नाही, आमच्या लिहिण्यात किंवा तुमच्या वाचण्यातही बिलकुल चूक नाही. तुम्ही जे वाचलं ते अगदी बरोबर आहे. अपघातामुळेच एका तरुणाचा जीव वाचला आहे. आता अपघात कसा काय चांगला ठरू शकतो, असं तुम्ही म्हणाल. तर नेमकं काय घडलं ते पाहुयात. अपघाताचे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अशाच एका अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. या व्हिडीओने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. याचं कारणही तसंच. एका बाईकस्वार तरुणाचा अपघात झाला आणि या अपघातानेच त्याचा जीव वाचवला आहे. एक बाईक ट्रकला धडकली आणि या ट्रकनेच बाईकस्वाराला वाचवलं. तुम्हालाही सायकल/गाडी चालवताना मोबाईल बघायची सवय असेल तर हा VIDEO पाहाच, घडली भयानक दुर्घटना व्हिडीओत तुम्ही पाहू शकता रस्त्यावरून काही गाड्या जात आहेत. रस्त्याच्या एका बाजूने बाईक आणि दुसऱ्या बाजूने ट्रक येतो. बाईक आणि ट्रकची धडक होते. बाईक ट्रकला धडकताच बाईकस्वार थेट हवेत उडतो. त्याचक्षणी आपल्या काळजाचा ठोका चुकतो. पण पुढे असं काही घडतं ज्याचा कुणी विचारही केला नसेल.

News18लोकमत
News18लोकमत

बाईकस्वार जसा बाईकवरून उडतो तसा तो त्याच ट्रकमध्ये जाऊन पडतो, ज्याला तो धडकतो. बाईकस्वाराला उडवणारा ट्रकच त्याला वाचवतो.

जाहिरात

या तरुणाचा काळ आला होता पण वेळ नाही. या तरुणाचं नशीब चांगलं म्हणून तो अशा चमत्कारिक पद्धतीने अपघातातून बचावला. पण प्रत्येक वेळी नशीब साथ देईलच, चमत्कार होईलच असं नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात