मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /व्वा! 'मेरे सपनो की रानी' गाणं काय वाजवलंय; Mumbai police band चा जबरदस्त VIDEO

व्वा! 'मेरे सपनो की रानी' गाणं काय वाजवलंय; Mumbai police band चा जबरदस्त VIDEO

मुंबई पोलीस बँडने (Mumbai police band) 'मेरे सपनो की रानी'चं म्युझिक (Mere sapno ki rani) रिक्रिएट केलं आहे.

मुंबई पोलीस बँडने (Mumbai police band) 'मेरे सपनो की रानी'चं म्युझिक (Mere sapno ki rani) रिक्रिएट केलं आहे.

मुंबई पोलीस बँडने (Mumbai police band) 'मेरे सपनो की रानी'चं म्युझिक (Mere sapno ki rani) रिक्रिएट केलं आहे.

मुंबई, 20 ऑक्टोबर :  जवान किंवा पोलिसांचा बँड म्हटला की त्यात एक शिस्तबद्ध लय असते. म्हणजे एक विशिष्ट प्रकारचं म्युझिकच आपल्याला ऐकायला मिळतं. पण मुंबई पोलिसांनी (Mumbai police) काहीतरी हटके करण्याचा प्रयत्न केला आहे. मुंबई पोलीस बँडने (Mumbai police band) चक्क बॉलिवूड क्लासिक गाण्याचं म्युझिक वाजवलं आहे.  मुंबई पोलीस बँडच्या 'मेरे सपनो की रानी'चा (Mere sapno ki rani) व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे.

नागरिकांसाठी 24 तास ऑनड्युटी असलेले मुंबई पोलीस सोशल मीडियावरही ड्युटीत मागे नाहीत. सोशल मीडियावर (Mumbai police social media)  ते सर्वात जास्त अॅक्टिव्ह आहेत. सोशल मीडियावर त्यांच्या भन्नाट पोस्ट असतात (Mumbai police social media post) . सोशल मीडियाच्या  माध्यमातून मनोरंजक पद्धतीने ते जनजागृती करतात. त्यांच्या मजेदार पोस्ट नागरिकांना खूपच आवडतात. त्यामुळे मुंबई पोलिसांचं वारंवार कौतुक केलं जातं असतं. नुकताच मुंबई पोलिसांनी आपल्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यात मुंबई पोलीस बँडची कमाल पाहायला मिळेल.

मुंबई पोलीस बँडने मेरे सपनों की रानी या गाण्याची धून वाजवली आहे. आराधना फिल्ममधील किशोर कुमार यांचं हे गाणं मुंबई पोलिसांनी रिक्रिएट केलं आहे. हा व्हिडीओ त्यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आहे.

हे वाचा - KhakiStudio : 'ऐ वतन तेरे लिऐ', मुंबई पोलीस बँण्डची खास धून सोशल मीडियावर हिट

एक सदाबहार प्रश्न आणि किशोर कुमा यांचं एक प्रतिष्ठित गाणं – मेरे सपनों की रानी कब आएगी तू. असं कॅप्शन देत या पोस्टला खाकी स्टुडियो, म्युझिकल मंडे और मुंबई पोलीस बँड असे हॅशटॅगही देण्यात आले आहेत. खाकी स्टुडिओचा हा व्हिडीओ राजेश खन्ना आणि शर्मिला टागोर यांच्या प्रसिद्ध सीनसोबत जोडण्यात आला आहे. 4 मिनिटांपेक्षा अधिक असलेला हा व्हिडीओ नेटिझन्सना खूप आवडला आहे. त्यावर बऱ्यात कमेंट येत आहेत.

हे वाचा - कधी कंगना, तर कधी दयाबेन! या 9 वर्षाच्या मुलीनं अभिनायतून केली कमाल

गेल्या महिन्यातही मुंबई पोलीस बँडने 1986 मधील कर्मा चित्रपटातील 'ए वतन तेरे लिऐ' ची धून वाजवली होती. तर त्याआधी जेम्स बाँडची थीम वाजवली होती आणि त्यालाही नेटकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता.

First published:
top videos

    Tags: Mumbai police, Social media, Song, Viral, Viral videos